शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी स्टॅलिनप्रमाणे आंदोलन चिरडू नये :राजू शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:30 IST

FarmarStrike, RajuShetti, Kolhapurnews दिल्लीच्या सभोवती अर्धसैनिक बल तैनात करून मोदी सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. स्टॅलिनने रशियात असेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर रणगाडे घालून बळाच्या जोरावर आंदोलन चिरडले होते. आता पंतप्रधान मोदींनी दुसरे स्टॅलिन होऊ नये, नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.

ठळक मुद्देमोदींनी स्टॅलिनप्रमाणे आंदोलन चिरडू नये,राजू शेट्टी यांचा इशारा विधेयक मागे घेईपर्यंत शेतकरी हटणार नाही

कोल्हापूर : दिल्लीच्या सभोवती अर्धसैनिक बल तैनात करून मोदी सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. स्टॅलिनने रशियात असेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर रणगाडे घालून बळाच्या जोरावर आंदोलन चिरडले होते. आता पंतप्रधान मोदींनी दुसरे स्टॅलिन होऊ नये, नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.

विधेयक मागे घेईपर्यंत शेतकरी अजिबात मागे हटणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने मोदींनी पुढचा धोका ओळखून मनाचा मोठेपणा दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीतील चारही बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन शेट्टी हे कोल्हापुरात परतले आहेत. तेथील अनुभव त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीत कथन केला व मोदींना सबुरीचा सल्लाही दिला.

ते म्हणाले, पंजाब, हरयाणातील प्रत्येक कुटुंबातील एकेक सदस्य आंदोलनाला बसला आहे. जमिनीचा तुकडा वाचवण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, वृद्धासह तरुणही आंदोलनात आहेत, जीव गेला तरी मागे हटायचे नाही, अशी त्यांची ठाम मानसिकता आहे. भडका उडाला तर त्याची किंमत देशाला मोजावी लागेल, तेव्हा मोदी यांनी दोन पाऊले मागे घेत हे विधेयक मागे घ्यावे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर