शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणारे मोदी सरकार हटवा : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:51 IST

मालगाव (ता. मिरज) : खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देमालगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा, शाखेचे उद्घाटन

मालगाव (ता. मिरज) : खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सात-बारा कोरा करण्याचे केवळ आश्वासन देणाºया व स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू न करणाºया मोदी सरकारला सत्तेवरून हटविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केले. शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याचीही मागणी केली.

मालगाव येथे स्वाभिमानी विद्यार्थी व वाहतूक संघटनेच्या शाखा उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यावेळी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, देशात भाजपची सत्ता येण्यापूर्वी पंतप्र्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांच्या शेतजमिनीवर असलेला कर्जाचा बोजा कमी करून सात-बारा कोरा करण्याबरोबरच शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्याची आश्वासने दिली होती. मात्र सत्ता मिळताच मोदी सरकाने शेतकºयांना वाºयावर सोडले.

खा. शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या व दुटप्पी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादनाला हमीभाव नाही. शेतकºयांना कर्ज देतानाही दुटप्पीपणा सुरू केला आहे. उद्योगपतींना ४० हजार कोटीचे कर्ज विनातारण दिले जाते, मात्र शेतकºयांना दहा हजार रूपयांच्या कर्जासाठी लाखो रूपये किमतीची जमीन तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळू शकत नाही. हे अन्यायकारक धोरण बदलण्यासाठी व केवळ शेतकºयांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आहे. देशातील २१ संघटनांनी एकत्र येऊन शेतकºयांच्या प्रश्नासाठी संसदेचे एक आठवड्याचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी राष्टपतींकडे केली आहे. मोदी सरकारला सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा व शेतकºयांचा विसर पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना सत्तेवरून हटविण्याची गरज आहे.शेतकºयांच्या न्यायासाठी लढा सुरू ठेवणारदेशातील उद्योगपती नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी यांनी करोडो रूपयांचे घोटाळे करून देश सोडला. मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. उद्योगपतींना दिलेली कोट्यवधीची कर्जे सरकार माफ करते; मात्र सर्वसामान्य शेतकºयांना कर्जमाफी देताना निकष लावले जातात. कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाते. सरकारचा हा दुटप्पी अन्याय सहन न होणारा असल्याने आम्ही सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरू केला आहे. शेतकºयांच्या न्यायासाठी हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारण