शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

शिवाजी विद्यापीठात साकारले आधुनिक तंत्रज्ञान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:44 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला उपयुक्त ठरणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकासाचे पाऊल शिवाजी विद्यापीठाने टाकले आहे. इंडो-जर्मन टूल्स रूम अंतर्गत विद्यापीठात अ‍ॅडव्हॉन्सड टेक्नॉलॉजी सेंटर साकारले आहे. या केंद्रांतर्गत कमी कालावधीच्या विविध बारा अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल्स रूम (आयजीटीआर) ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला उपयुक्त ठरणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकासाचे पाऊल शिवाजी विद्यापीठाने टाकले आहे. इंडो-जर्मन टूल्स रूम अंतर्गत विद्यापीठात अ‍ॅडव्हॉन्सड टेक्नॉलॉजी सेंटर साकारले आहे. या केंद्रांतर्गत कमी कालावधीच्या विविध बारा अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल्स रूम (आयजीटीआर) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानंतर विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान केंद्राची (एटीसी) सुरुवात केली आहे. या केंद्रांतर्गत विद्यार्थी, विविध कंपन्यांमध्ये कार्यान्वित असलेले अभियंते, कर्मचाºयांना तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील नवसंशोधन, ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी विविध बारा अभ्यासक्रम सुरू केले आहे. त्यामध्ये अ‍ॅटोकॅड, सॉलिड वर्क, सीएनसी प्रोग्रॅमिंग, रिवीट आर्किटेक्चर, थ्री डीएस मॅक्स, स्काडा, आदींचा समावेश आहे. या ‘एटीसी’द्वारे पुस्तकीज्ञानासह प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास साधला जाणार आहे.प्रगत संशोधन, नवीन अभ्यासक्रमदेशातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने इंडो जर्मन टूल्स रूमची स्थापना केली. भारत सरकार,जर्मनीचे संघिय प्रजासत्ताक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा एकत्रित प्रकल्प असलेल्या ‘आयजीटीआर’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता साधने, प्रशिक्षित कर्मचारी, मार्गदर्शन केले जाते. या सुविधा शिवाजी विद्यापीठातील उपकेंद्रामध्ये उपलब्ध असणार आहेत. सामंजस्य करार झाल्यामुळे विद्यापीठ आणि आयजीटीआर हे प्रगत संशोधनाची सोय, नवीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य प्रशिक्षण व विकास याबाबत एकत्रितपणे काम करणार आहेत.दिवाळीनंतर अभ्यासक्रमांची सुरुवातअ‍ॅडव्हॉन्सड टेक्नॉलॉजी सेंटर (एटीसी) हे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला विद्यापीठाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, इंडो-जर्मन टूल्स रूमच्या सहकार्यातून याठिकाणी उद्योगविश्वाला आवश्यक असणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडविण्यासाठी अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. याअंतर्गत पहिला टप्प्यात बारा अभ्यासक्रमांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिवाळीनंतर या अभ्यासक्रमांची सुरुवात होईल. कौशल्य विकासासह जे कुशल आहेत, त्यांच्यातील कौशल्य अधिक वाढविण्यासाठी ‘एटीसी’ उपयुक्त ठरणार आहे. एटीसी हे सर्वांसाठी खुले राहणार आहे.