शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मॉडर्न फॉमॉकोलॉजी अभ्यासक्रमास मान्यता

By admin | Updated: March 25, 2016 23:31 IST

आरोग्य विभाग विद्यापीठाची अधिसूचना : होमिओपॅथीच्या डॉक्टरना लाभ

मिरज : सर्व होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांसाठी आवश्यक असणारा मॉडर्न फॉमॉकोलॉजी (आधुनिक औषध निर्माण शास्त्र) अभ्यासक्रम राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांमध्ये सुरु करण्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र आरोग्य विभाग विद्यापीठ, नाशिक यांनी काढली आहे. त्यामुळे होमिओपॅथिक व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना हा कोर्स पूर्ण केल्यानंतर रितसर वैद्यकीय व्यवसायाची संधी महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे.होमिओपॅथिक डॉक्टरांना आधुनिक उपचार पद्धतीचा व्यवसाय करण्यापासून अनेक बंधने होती. गेल्या ३० वर्षांपासून या डॉक्टर्सची मागणी होती. अद्यापही ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णांना उपचारही होत नाहीत. त्यासाठी सातत्याने मोर्चे, निदर्शने व चर्चा या माध्यमातून आघाडी सरकारकडे सातत्याने मागणी करुन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकालात आॅगस्ट २०१४ मध्ये हा कोर्स पूर्ण करत या व्यावसायिकांना औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अटीवर हा व्यवसाय करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश दिला होता. त्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत आदेश दिला असून, आॅगस्ट २०१६ पासून प्रथम टप्प्याला राज्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा कोर्स सुरू होणार आहे. हा कोर्स सुरू करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कल, केंद्रीय होमिओपॅथीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे व सचिव पृथ्वीराज पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे.होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी उपचार करण्यासाठी मान्यता देण्याच्या शासन निर्णयाचे होमिओपॅथी महाविद्यालयांच्या संघटनेचे सचिव पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले. मिरजेतील गुलाबराव पाटील महाविद्यालयाने सर्वप्रथम होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी उपचाराची परवानगी देण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रमहा नवा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून, अभ्यासक्रमाची कालावधी १०८ दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहून करावयाचा आहे आणि अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत होमिओपॅथिक महाविद्यालयांकडे नोंदणी करून प्रवेश मिळणार आहे. सध्या १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात येईल. यामध्ये मिरज, कोल्हापूर, पुणे येथील शासकीय महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात येईल.