शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:30 IST

Shivaji University Exam Kolhapur-शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचा प्रारंभ दि. २२ मार्चपासून होणार आहे. या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यातील ऑनलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठीची मॉक टेस्ट (सराव परीक्षा) गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सहा हजार विद्यार्थांनी मॉक टेस्ट दिली आहे. या सत्रातील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा पर्याय सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी निवडला आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी सहा हजार जणांनी दिली परीक्षा सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी निवडला ऑनलाइन पर्याय

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचा प्रारंभ दि. २२ मार्चपासून होणार आहे. या परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यातील ऑनलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठीची मॉक टेस्ट (सराव परीक्षा) गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सहा हजार विद्यार्थांनी मॉक टेस्ट दिली आहे. या सत्रातील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा पर्याय सुमारे ६० हजार विद्यार्थ्यांनी निवडला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाने स्थापन केलेल्या गुळवणी समितीच्या शिफारसीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने हिवाळी सत्रातील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए., बी.व्होक., बॅचलर ऑफ इंटेरियर डिझाईनिंग, फूड टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट अशा विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ३२४ परीक्षा होणार आहेत.

एक तासाची ५० गुणांची बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यासाठीची मॉक टेस्ट विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने गुरुवारपासून सुरू केली. ही टेस्ट दि. २२ मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ही टेस्ट देता येणार आहे. त्याबाबतची माहिती त्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली असल्याचे परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी सांगितले.अभियांत्रिकी, लॉ अभ्यासक्रमाच्या परीक्षा एप्रिलमध्येया परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी बैठक नियोजन समितीची बैठक झाली. त्यातील चर्चेनुसार बी.एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होतील. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १ एप्रिल, तर लॉ (विधी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ५ एप्रिलपासून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती परीक्षा नियोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. मेघा गुळवणी यांनी दिली.एका दिवसातील चार विविध सत्रांमध्ये परीक्षा होतील. एम.बी.ए., एम.कॉम., अशा ज्या अभ्यासक्रमांचे प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि तोंडी परीक्षा आहेत, या परीक्षा महाविद्यालय पातळीवर होणार आहेत.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर