शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कोल्हापूर महानगरपालिकेवर मनसेचा वरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 20:19 IST

महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेतील काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले. बँडबाजासह वरात घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिकेवर मनसेचा वरात मोर्चा अमृत योजनेतील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अमृत पाईपलाइन योजनेतील काम योग्य दर्जाचे होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्यांनी अनोखे आंदोलन केले. बँडबाजासह वरात घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.अमृत पाईपलाइन योजनेचे ११५ कोटी रुपयांचे काम महापालिकेच्या वतीने दास या खासगी कंपनीला काम दिले आहे. सुरुवातीपासूनच योजना वादग्रस्त ठरली आहे. अनेक वेळा महासभा, स्थायी समिती सभांमध्येही ठेकेदारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.पावसाळ्यापूर्वी या कंपनीने कोल्हापुरात काम सुरू केले, याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पंचनामा करण्यात आला. ज्या पद्धतीने कामाचे टेंडर भरण्यात आले, त्या पद्धतीने काम झाले नसल्याचे निदर्शनास आले. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या या कामाला स्थगिती द्यावी व कामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मनसेकडून महापालिकेवर वरात मोर्चा काढण्यात आला.

काही दिवसांत याचा खुलासा झाला नाही तर महापालिकेला टाळे ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेने दिला. या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, राजू बागवान, कृष्णात दिंडे, राज मकानदार, बबन सावरे, अमित फराकटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.महापालिका प्रवेशद्वाराजवळ रुखवतया आंदोलनात वरातीत रुखवत म्हणून वाळू, खडी, सिमेंट, माती हे ठेवण्यात आले होते. हे सर्व महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून पाइर्पलाइर्नच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनामुळे मोठे लग्नसमारंभ व वरातीला बंदी असली तरी कोल्हापुरात वाजतगाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत घोड्यावरून वरात निघाली. यानिमित्ताने बँडबाजाचालकांना तब्बल सहा महिन्यांनंतर कामही मिळाले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर