वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली. त्यामुळे पूर, ढगफुटी, कोरडा दुष्काळ, भूत्खलन, दरडी कोसळणे, अचानक उकाडा असा वातावरणातील असमतोलपणा प्रत्येकजण अनुभवत आहे. कोरोनामुळे तर ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला असता वृक्षलागवड वाढवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होते. वृक्षलागवड व संवर्धन चांगले असेल, तर नैसर्गिक समतोल राखला जाऊ शकतो.
वाढत्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी आता झाड लावणे नव्हे, तर झाडांचे जंगल निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘आम्ही फक्त झाड लावत नाही, तर जंगल तयार करतो’ असे ब्रिदवाक्य घेऊन फाउंडेशन कार्यरत आहे. त्यासाठी नागरिकांनी जागा द्यावी. तेथे ३०० झाडे लावून त्याचे संगोपन मियावाकी पद्धतीनुसार केले जाणार आहे. या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी फाउंडेशनचे राहुल बोरा, राहुल शेटे, श्रीकांत भंडारी, जगदीश पाटील, प्रकाश पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.