शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षकाअभावी थांबली खाणपट्ट्यांची मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:49 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वर्षभरात किती उत्खनन झाले?, किती रॉयल्टी भरली? यासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वर्षभरात किती उत्खनन झाले?, किती रॉयल्टी भरली? यासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा खनिकर्म विभागाकडून दगड खाणींची मोजणी केली जाते. यंदाची मोजणी अद्याप झालेली नाही. खनिकर्म विभागाला सर्व्हेअर (सर्वेक्षक) उपलब्ध होत नसल्याने ही मोजणी रखडली आहे. या कार्यालयात कायमस्वरूपी हे पद असावे, यासाठी दोन वर्षांपूर्वीच शासनाकडे मागणी केली आहे; परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.जिल्ह्यात ६० दगडखाणी आहेत. त्यांची दरवर्षी जिल्हा खनिकर्म विभागाकडून मोजणी केली जाते. यामध्ये भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाच्या सर्व्हेअर (सर्वेक्षक) कडून हे काम करून घेतले जाते. ‘ईपीएस’ मशीनद्वारे ही मोजणी करून त्याचे मोजमाप टन किंवा ब्रासमध्ये केले जाते; कारण खनिकर्म कार्यालयाकडे हे पद मंजूर नसल्याने त्यांना ‘भूविज्ञान’च्या सर्वेक्षकावर अवलंबून राहावे लागते. ‘भू विज्ञान ’ कार्यालयाच्या अंतर्गत १२ जिल्हे असून, त्यांचाही व्याप मोठा आहे; त्यामुळे त्यांचे काम झाल्यावरच सर्वेक्षक उपलब्ध होते; त्यामुळे त्यांच्या वेळेनुसारच मोजणीचे काम करावे लागते. बहुतांश राज्यभरातील जिल्हा खनिकर्म कार्यालयातील हे चित्र आहे.वर्षातून किमान एकदा पावसाळ्यापूर्वी ही मोजणी होणे आवश्यक आहे; परंतु कोल्हापूर जिल्ह्यात यंदाची खाणपट्ट्यांची मोजणी अद्याप झालेली नाही. सर्वेक्षकांची उपलब्धता नसल्याने ही मोजणी रखडली आहे.‘भूविज्ञान’ कार्यालयाकडेच्या कामातच सर्वेक्षक अडकल्याने ते पूर्ण झाल्यावरच उपलब्ध होणार आहे; त्यामुळे आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी होणारी ही अडचण लक्षात घेता जिल्हा खनिकर्म विभागासाठी कायमस्वरूपी एका सर्वेक्षकाचे पद मंजूर करावे, अशी मागणी दोन वर्षांपूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाने राज्य शासनाला केली आहे; परंतु त्याकडे शासनाने कानाडोळा केल्याचे दिसत आहे. वेळेवर ही मोजणी होत नसल्याने दगडखाणींमधून नेमके किती उत्खनन झाले? त्याच्याकडून किती रॉयल्टी आकारायची याबाबत समस्या निर्माण होत असतात. जर हक्काचा सर्वेक्षक मिळाला, तर दर तीन महिन्यांतून एकदा खाणपट्ट्यांची मोजणी होऊन खनिकर्म विभागाचे काम सोपे होऊ शकते, असे सूत्राकडून सांगण्यात आले.