शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा आनेवाडी टोलनाक्यावर अनर्थ!--उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:50 IST

सायगाव : ‘सातारा हा लोकसभा मतदार संघ माझा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाका कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या व्यक्तीकडे जाऊ देणार नाही,

ठळक मुद्दे ‘लोकमत’च्या वृत्तानंतर स्थानिक कामगारांमध्ये अस्वस्थता तुम्हाला उद्रेक पाहायचा असेल तर पाहा.. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली

लोकमत न्यूज नेटवर्क

सायगाव : ‘सातारा हा लोकसभा मतदार संघ माझा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आनेवाडी टोलनाका कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या व्यक्तीकडे जाऊ देणार नाही, अन्यथा गाठ माझ्याशी आहे. स्थानिक कर्मचाºयांना कामावरून काढून टाकले तर, अनर्थ घडेल,’ असा सज्जड दम खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.पुणे-बेंगलोर महामार्गावर असणारा आनेवाडी टोलनाका दि. १ आॅक्टोबरपासून अशोका स्थापत्य कंपनीकड़ून काढून घेत कोल्हापूरच्या मक्रोलाइन कंपनीकडे येथील व्यवस्थापनकडे जाणार असल्याचे वृत्त बुधवारी फक्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्तामुळे जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांना आनेवाडी येथील स्थानिक कामगारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.‘काहीही झाले तरी टोलनाका अगोदरचेच लोक चालवणार आहेत. कारण दुसºया कुणाला हा टोलनाका अजिबात चालवता येणार नाही, नाही तर रिलायन्स कंपनीला मोठा भुर्दंड बसणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मी संबंधित कोण आहेत, त्यांच्याशी लवकर बोलून घेणार आहे आणि येथील भूमिपुत्र कामगार वर्गावर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका,’ असे आश्वासन येथे उपस्थित कामगार वर्गाला दिले. बाहेरच्या जिल्ह्यातून कंत्राटदार येणार असल्याने कामगार वर्गही पर जिल्ह्यातून आणले जाणार असल्याने येथील भूमिपुत्र कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार राहणार आहे. रिलायन्स कंपनीकडे याबाबत विचारणा केली तरीही कोणतीही माहिती दिली जात नसल्यामुळे कामगारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे, अशी भावना व्यक्त करणारे निवेदन येथील कामगारांनी खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन दिले.तर टोल नाका चालू देणार नाही..आनेवाडी टोलनाक्यावर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळाली आहे. व्यवस्थापन बदलो किंवा न बदलो, स्थानिक कर्मचाºयांवर या बदलामुळे गदा येणार असेल तर हा टोल नाका चालू देणार नाही, तुम्हाला उद्रेक पाहायचा असेल तर पाहा.. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे, असेही उदयनराजे म्हणाले.