शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

वनमित्र संस्थेकडून ‘मिरवेल’ गाव दत्तक

By admin | Updated: June 17, 2016 00:26 IST

लोकांच्या विकासासही प्राधान्य : नैसर्गिक, पर्यावरणपूरक विकास होणार

जहॉँगिर शेख -- कागल --निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता या क्षेत्रांत सामाजिक कार्य करणाऱ्या येथील वनमित्र संस्थेने ‘नैसर्गिक पर्यावरणपूरक विकास’ या संकल्पनेतून चंदगड तालुक्यातील ‘मिरवेल’ हे पारगडच्या पायथ्याशी असलेले गाव दत्तक घेतले आहे. प्रायोगिक पद्धतीने या छोट्याखानी गावात ही संस्था विविध प्रयोग करून पर्यावरणपूरक नैसर्गिक विकासाद्वारे गावचा आणि गावातील लोकांचा विकास घडवून आणणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील मेंढालेखा या गावाने वन विभागाच्या क्षेत्रात असूनही वनसंपदेच्या रक्षणाबरोबरच त्याचे संवर्धन करीत वनसंपदेच्या माध्यमातून गावाचा मोठा आर्थिक विकास केला आहे. एका बाजूला वनसंपदेतून उत्पन्नही आणि दुसऱ्या बाजूला वनसंपदेचे रक्षण-संवर्धन, अशी ही संकल्पना तेथे राबविली आहे. यातून प्रेरणा घेत वनमित्र संस्थेने मिरवेल या गावाची निवड करून प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. पारगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे चंदगड तालुक्यातील हे गाव महाराष्ट्र-गोवा सीमेवर आहे. या गावापासून गोवा राज्याची हद्द केवळ सहा किलोमीटर आहे. हे छोटे गाव आहे. गावातील लोकांच्या मालकीची जमीन अवघी चार एकर आहे. त्यामध्ये दोन एकर जिरायत, तर दोन एकर बागायत आहे. मात्र, गावच्या सभोवती वन विभागाच्या मालकीचे मोठे जंगल आहे. या जंगलाचा उपयोग वस्तू उत्पादनासाठी करून घेणे आणि त्यातून गावचा आर्थिक विकास घडवून आणणे, हे करीत असताना वनसंपदेला कोणताही धक्का लागू न देता उलट त्याचे रक्षण-संवर्धन करणे, असे हे नियोजन असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यासाठी सहमती दिली आहे. गावातील नागरिकांनी संमती दिल्यानंतर आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. संस्थेचे अशोक शिरोळे, विक्रम चव्हाण, अमोल भुरले, मिथून कल्ले, राजू घोरपडे, काशिनाथ गारगोटे, बाळ जाधव, कैलास पाटील, लखन तुरगुडे, आदींनी गावाला भेटी देऊन प्राथमिक बैठका घेतल्या आहेत.