शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

मिरज तालुक्यात भाजपची प्रथमच धडक

By admin | Updated: February 23, 2017 22:53 IST

सात गट, दहा गणात विजय : पंचायत समितीमध्येही दहा जागांसह सत्तेच्या समीप

सदानंद औंधे --मिरजकाँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात भाजपने जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या दहा जागा जिंकून मोठे यश मिळविले. २२ पैकी १० सदस्य निवडून आल्याने मिरज पंचायत समितीत भाजप सत्ता हस्तगत करण्याची चिन्हे आहेत. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ११ पैकी तब्बल सात ठिकाणी भाजप उमेदवार निवडून आले. काँग्रेसला तीन व शेतकरी संघटनेला एक जागा मिळाली. मिरज पूर्व व पश्चिम भागात भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिला. मिरज पूर्व भागातील मालगाव, आरग, बेडग, म्हैसाळसह पश्चिम भागातील बुधगाव, कवलापूर, समडोळी येथे भाजपला यश मिळाले. एरंडोली, भोसे, कसबे डिग्रज येथे काँग्रेस व कवठेपिरान जि. प. मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडसुळे निवडून आल्या. गुंडेवाडी, मालगाव, नरवाड, खटाव, आरग, म्हैसाळ, टाकळी, इनाम धामणी, बुधगाव, बेडग पंचायत समिती मतदार संघात भाजपला यश मिळाले. सोनी, भोसे, सलगरे, बामणोली, कवलापूर, माधवनगर, कवठेपिरान पंचायत समिती मतदार संघात काँग्रेस, समडोळी, कसबे डिग्रज येथे राष्ट्रवादी काँग्रेस, दुधगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, एरंडोलीत अजितराव घोरपडे यांची विकास आघाडी, नांद्रे मतदार संघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आला. गत जिल्हा परिषद निवडणुकीत दहापैकी आठ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. मिरज पूर्व भागात अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीसोबत निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादीचे पानिपत झाले. घोरपडे यांच्या विकास आघाडीच्या शालन भोई या एकमेव उमेदवार एरंडोली पंचायत समिती मतदार संघातून निवडून आल्या आहेत. एरंडोलीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांना बंडखोर संगीता खुळे यांनी आव्हान दिले होते. मात्र जयश्री पाटील यांनी शंभर मतांनी निसटता विजय मिळवून ही जागा राखली. मालगावात काँग्रेस आघाडीला बंडखोरीचा फटका बसल्याने येथे गट व गणात भाजपला चांगले यश मिळाले. बुधगाव गटात विद्या डोंगरे व त्यांचे पती शिवाजी डोंगरे कवलापूर गटात भाजपकडून निवडून आले. मिरज वैरण बाजारातील शासकीय गोदामात मतमोजणी झाली. दुसऱ्या फेरीचे निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी मीनाझ मुल्ला यांनी जाहीर केले. निकालानंतर उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण जल्लोष केला.जनाबाई पाटील दावेदारपंचायत समिती सभापती पदासाठी ओबीसी महिला आरक्षण असून सलगरे, एरंडोली व कवलापूर या ओबीसी महिला गणातून भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. खटाव गणातून भाजपच्या जनाबाई पाटील या एकमेव ओबीसी महिला उमेदवार निवडून आल्याने त्या सभापती पदासाठी दावेदार ठरणार आहेत. मिरज पंचायत समितीत भाजपला आणखी एका सदस्याची आवश्यकता असून अपक्षांच्या मदतीने सत्ता हस्तगत करणे भाजपला शक्य होणार आहे. म्हैसाळ गटातून भाजपच्या प्राजक्ता कोरे यांनी तब्बल २२०० मतांनी विजय मिळविला. मतमोजणीवेळी कोरे या आघाडीवर असल्याचे वृत्त समजल्यानंतर भाजप समर्थकांनी जल्लोष केला. थोड्या वेळानंतर राष्ट्रवादी उमेदवार आलमआरा बुबनाळे आघाडीवर असल्याचे समजल्याने राष्ट्रवादी समर्थकांनीही गुलालाची उधळण केली. पण मतांची बेरीज करण्यात चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा कोरे यांना विजयी घोषित करण्यात आले. यामुळे म्हैसाळात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते गुलालात रंगले होते.