शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीला महिन्यात मंत्रिपद : चंद्रकांतदादा

By admin | Updated: November 10, 2015 00:01 IST

आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव अर्थखात्याने बायबॅकचे कोणतेही प्रस्ताव अडविलेले नाहीत.

सांगली : दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद, अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यामुळे सांगलीला हवा तेवढा वेळ आपणास देता आला नाही. मंत्रिपदाचा या जिल्ह्याचा अनुशेष येत्या महिन्याभरात दूर होणार असल्याने सांगलीची चिंता मिटेल, असे मत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, सांगलीसाठी अनेक योजना सरकारने मंजूर करून त्याची अंमलबजावणीही केली आहे. अग्रणी नदी पुनरुज्जीवन, चांदोली पर्यटन विकास, वायफाय सुविधा, महाराजस्व अभियान अशा अनेक योजना जिल्ह्यात राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका चुकीची आहे. सांगली जिल्ह्यातून जे विकासाचे प्रस्ताव येतील, त्यांचा पाठपुरावा करून मंजुरी मिळवून देण्यात येईल. मंत्रिपद नसल्याने होत असलेली सांगली जिल्ह्याची अडचणही मी समजू शकतो. येत्या महिन्याभरात ही अडचण दूर होईल. सांगलीतला टोल बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बायबॅकचे जेवढे प्रस्ताव तयार झाले आहेत, त्याला मंजुरी मिळेल. आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव अर्थखात्याने बायबॅकचे कोणतेही प्रस्ताव अडविलेले नाहीत. त्यामुळे सांगलीच्या टोलबाबतही नागरिकांनी निश्चिंत राहावे. यापुढे सांगलीकरांना टोल द्यावा लागणार नाही. सांगलीच्या चांदोली पर्यटन विकासाअंतर्गत मत्स्यबीज प्रकल्पासाठी निधी उलपब्ध करून देण्यात आला आहे. याठिकाणी ट्रॅकिंग ट्रॅक व अन्य सुविधांसाठीही शासन मदत करणार आहे. जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळे व तीर्थस्थळांचा विकास करण्यात येईल. शासनाच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जिल्ह्यात नाबार्ड-राज्यमार्ग, जिल्हा व इतर मार्गांतर्गत एकूण ८० प्रकल्पांना लवकरच सुरुवात होईल. महामार्गांच्या प्रस्तावाबाबतही पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जमिनी संपादनाचा प्रश्न...रस्त्यांचे रुंदीकरण आणि नव्या महामार्गांच्या कामात सर्वांत मोठा अडथळा भूमी संपादनाचा येत आहे. लोकांशी चर्चा करून त्यांची समजूत घालून जमिनी संपादन करण्यात वेळ जातो. त्यामुळे प्रकल्प रेंगाळून खर्च वाढतो. सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणातही असाच अनुभव आला. तरीही आता जमीन संपादनाचा प्रश्न निकालात काढला आहे. यापुढे कोणत्याही रस्ते प्रकल्पात अशा अडचणी येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करू, असे पाटील म्हणाले.