शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 16:29 IST

२१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे.

कोल्हापूर : आणखी चार पाच महिने तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार नाहीत असा अंदाज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘चंदगड’ भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, २१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. येथील मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे प्रशासक म्हणून नेमले जातील. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे. कारण चार, पाच महिने जिल्हा परिषद निवडणुका होणार नाहीत.कारण ओबीसी आरक्षणाबाबत १७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. इम्पिरिकल डाटाचे तुमचे काम प्रगतीपथावर आहे का अशी विचारणा न्यायालयाने महाराष्ट्राला केली होती. त्यानुसार आम्ही मागास आयोगासाठी निधी दिला आहे. मनुष्यबळ दिले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यत निवडणुका घेवू नयेत अशीही मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी तीन, चार महिने वेळ लागेल.सर्व जिल्ह्यांमध्ये अशा पध्दतीने भवन उभारणीकोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा ११० ते १६० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून आलेल्या सदस्य, सरपंच यांना एका दिवसात जिल्हापातळीवरील सर्व कामे करता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवासासाठी सदस्य निधीतून हे ‘चंदगड भवन’ उभारण्यात आले आहे. अशा पध्दतीने ज्या जिल्ह्यात अडचण असेल तेथील जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिल्यास तेथेही भवन उभारण्यास सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी मुश्रीफ यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद