शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवेवर परिणाम, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत मंत्री हसन मुश्रीफांनी दिली महत्वाची माहिती

By पोपट केशव पवार | Updated: October 16, 2023 15:50 IST

आरोग्य विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे उदघाटन

कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे गरज असेल तरच वैद्यकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापुरात सांगितले. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे उदघाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. शेंडा पार्कातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु, निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयाची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून विभागीय केंद्रासाठी दिली आहे. या जागेची एनओसीची प्रक्रिया तत्काळ करून घ्या. या विभागीय केंद्राच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे संशोधन व्हावे. इमारत, इतर सुविधांसाठी विद्यापीठाकडे निधी नसेल तर सरकारच्यावतीने तो उपलब्ध करून दिला जाईल.कुलगुरु कानिटकर म्हणाल्या, विद्यापीठाच्या सर्व विभागीय केंद्रांमध्ये संशोधन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. मुंबईतील ऐरोलीत वैद्यकीय तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सुरु आहे. कोल्हापूर विभागीय केद्रातही फॅमिली डॉक्टरवर आधारित त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनातून संशोधन प्रकल्प सुरु करण्यात येईल. येथे लवकरच तीन-चार कर्मचारी व इतर स्टफ कार्यान्वित करून हे केंद्र सुरु करू. विविध अभ्यासक्रमही या केंद्रातून सुरु केले जातील.   हाऊसकिपिंग, सुरक्षा हे अधिष्ठातांचे काम नव्हेसरकारी रुग्णालयातील हाऊसकिपिंग, सुरक्षा व्यवस्था हे अधिष्टातांचे काम नाही. पण आपल्याकडे या सगळ्यांची जबाबदारी अधिष्ठातांच पाहतात. यामुळे त्यांचे मूळ आरोग्यसेवेचे काम बाजूलाच राहते. त्यामुळे हा विभागच वेगळा करणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ म्हणाले.अवयवदानावर प्रबोधन व्हावेअवयवदान चळवळीबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयांबाबत विश्वास वाढला पाहिजे यादृष्टीने काम करा असेही मुश्रीफ म्हणाले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफMedicalवैद्यकीयTransferबदली