कोल्हापूर : पेन्शन योजनेची अंमलबजावणी करा, किमान वेतन लागू करा, मानधनात वाढ करा, या मागणीसाठी आज, सोमवारी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. महावीर गार्डन येथून अध्यक्ष आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सेविका व मदतनिसांनी जिल्हा परिषदेच्या दारातच तब्बल दोन तास ठिय्या मारल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने वारंवार खोटी आश्वासने दिली आहेत. एकही आश्वासन त्यांनी पाळले नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आज रस्त्यावर उतरल्याचे आप्पा पाटील यांनी सांगितले. तुटपुंजे मानधन देतात, तेही वेळेत दिले जात नाही. तीन-चार महिने मानधन मिळत नसल्याने जगायचे कसे? असा प्रश्न सेविका व मदतनीस यांना पडला असून, शासन अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला-बालकल्याण) शिल्पा पाटील यांना देण्यात आले. यावेळी अर्चना पाटील, सरिता कंदले, जयश्री पाटील, शोभा भंडारे, शमा पठाण, सुनंदा टारे, अंजली क्षीरसागर, अनिता माने, सुषमा कदम, सुरेखा कोरे, संगीता कांबळे, उषा कुलकर्णी, सुनंदा कुराडे, विद्या कांबळे, आदी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)या आहेत मागण्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करा.जिल्हा परिषदेच्या शाळेतील खासगी अंगणवाड्या बंद करा.किमान वेतन लागू करा.मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी करा.एक महिन्याच्या मानधनाएवढी भाऊबीज द्या.नियमबाह्य कामाची सक्ती करू नका.अंगणवाड्यांना इमारती द्या.महिन्याच्या ५ तारखेपर्यंत मानधन द्या.मुलांना चांगला आहार द्या.
किमान वेतन, पेन्शन द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
By admin | Updated: July 22, 2014 00:43 IST