शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

मिनीबसला टँकरची धडक; पाच ठार

By admin | Updated: December 7, 2014 00:47 IST

कऱ्हाडजवळ अपघात : सर्वजण राजस्थानमधील; इचलकरंजीहून शिर्डीला जाताना काळाचा घाला

कऱ्हाड/मलकापूर : शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी मिनीबसला टँकरने पाठीमागून जोरदार धडक दिली. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत शनिवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातात ७ वर्षाच्या बालिकेसह पाचजण जागीच ठार झाले, तर १० भाविक गंभीररीत्या जखमी झाले़ जखमींवर कऱ्हाडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील जखमी व मृत मूळ राजस्थानचे असून, दक्षिण भारतातील देवदर्शनासाठी ते रेल्वेने इचलकरंजी येथे आले होते. तेथून शुक्रवारी रात्री भाडेतत्त्वावर खासगी मिनीबस घेऊन हे भाविक शिर्डीला जाण्यासाठी निघाले. मात्र, अर्ध्या वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दीपिका प्रकाश शर्मा (वय ७) या बालिकेसह तिची आई माया प्रकाश शर्मा (३५), सीता शंकरलाल चौधरी (५०), त्यांचे पती शंकरलाल उग्राराम चौधरी (५५) व संपतीबाई अमरचंद जहांगीड (४५, सर्व रा. अनंतापूर राजस्थान) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत़ अपघातस्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे राजस्थान येथील असलेले ओझा कुटुंबीय इचलकरंजीमध्ये वास्तव्यास आहेत. अनंतापूर-राजस्थान येथील त्यांचे नातेवाईक शर्मा, जहांगीड व चौधरी या तीन कुटुंबांतील सुमारे १७ सदस्य २० दिवसांपूर्वी राजस्थानवरून दक्षिण भारतातील देवदर्शनासाठी आले होते़ त्यांनी यापूर्वी जगन्नाथपुरी, बालाजी, रमेश्वरपूरम, कन्याकुमारी व महालक्ष्मी-कोल्हापूर हा प्रवास रेल्वेने पूर्ण केला होता़ ते शुक्रवारी रात्री इचलकरंजी येथून मिनीबस (एम़ एच़ १४ पी़, ८०८७) मधून देवदर्शनासाठी शिर्डीला निघाले होते़ शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील तळबीड येथे पोहोचले. लघुशंकेला जाण्यासाठी चालकाने बस महामार्गाकडेला थांबविली. त्यावेळी काही प्रवाशांसह चालकही बसमधून खाली उतरला़ नंतर चार प्रवासी सोडून इतर सर्वजण पुन्हा बसमध्ये जाऊन बसले़ त्याचवेळी कोल्हापूरहून मुंबईकडे भरधाव निघालेल्या दूध टँकरने (जी़ जे़ २३ एक्स, ६१६५) बसला पाठीमागून जोरदार धडक दिली़ त्यामुळे टँकरसह मिनीबसही महामार्गावरच उलटली.अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थ व महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी रक्त व मांसाचा सडा पडलेला होता. अपघाताची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे.दहाजण गंभीर जखमीदशरथमल सखाराम शर्मा (वय ६४), गीता दशरथमल शर्मा (४०), प्रकाश बाबुलाल शर्मा (३६), पवन दशरथमल शर्मा (२५), अरचंद बबुतराम जहांगीड (५२) मंजुदेवी सुरेश उपाधी (५२), कमलादेवी तेजपाल उपाधी (५५, सर्व रा. अनंतापूर, राजस्थान), विनोद गोपालजी ओझा (९), पूजा गोपालजी ओझा ( १७), विमल सतनारायण ओझा (६५) (तिघेही रा. इचलकरंजी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत़इचलकरंजीत शोककळाइचलकरंजी : अपघातग्रस्त हे काळू केटीन (मेडला सिटी, जि. नागौर, राजस्थान) येथील असून, ते इचलकरंजी येथे नातेवाइकांकडे आले होते. अपघाताचे वृत्त समजताच लिंबू चौकात शोककळा पसरली.काळू मेटीन (मेडला सिटी) येथील रहिवासी जोशी कुटुंबीय तिरुपती-बालाजी येथे जाऊन ४ डिसेंबरला इचलकरंजीत पवन शर्मा (रा. लिंबू चौक) यांच्याकडे आले होते. अपघातात जखमी झालेले दशरथमल व गीता शर्मा हे पवन यांचे माता-पिता होत. शर्मा कुटुंबीय ८ डिसेंबरला राजस्थानला महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाणार होते. दरम्यान, ते देवदर्शन करण्यासाठी शिर्डीला निघाले होते. (प्रतिनिधी)