शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दूध पावडरची ३४० रुपयांवर उसळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 05:40 IST

आतापर्यंतचा सर्वाधिक दर : वर्षात किलोमागे १६५ रुपयांची वाढ

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने मागणी आणि पुरवठ्यात तफावत वाढल्याने दूध पावडरच्या दराने उसळी घेतली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सध्या ३४० रुपये किलोचा दर असून, वर्षभरात किलोमागे तब्बल १६५ रुपयांची वाढ झाली आहे. त्या तुलनेत बटरचे दर प्रतिकिलो ९० रुपये वाढले आहेत.

दूध उत्पादन कमी होण्याला महापुराचे कारण पश्चिम महाराष्टÑापुरते असले तरी संपूर्ण देशातच दूध उत्पादन कमी झाले आहे. दुधाचे बिल आणि पशुखाद्याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी या व्यवसायापासून दूर जात आहेत. सप्टेंबर महिन्यात प्रतिकिलो २७५ रुपये दर होता, तो नोव्हेंबरमध्ये २८५ रुपयांपर्यंत पोहोचला. आता दर ३४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारने दूध कमी पडल्याने न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियातून पावडर आयात केली. गरजेपेक्षा अधिक पावडर आल्याने दुधाचे दर कोसळले. आताही पावडर आयात करण्याच्या हालचाली सुरू असल्याने दुधाच्या दरात पुन्हा घसरण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.दूध पावडर निर्मिती प्रकल्पएकूण २१ प्रकल्प :५४४ टन प्रतिदिनी.शासकीय - ४ (क्षमता ५१ टन)सहकारी - ५ (क्षमता १५२ टन)खासगी - १२ ( क्षमता ३४१ टन)

टॅग्स :milkदूध