शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

पाण्यापेक्षा दूध झाले स्वस्त; उत्पादकांचे कंबरडे मोडले : दूधदर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:48 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे. उत्पादनखर्च पाहता आता हातात जनावरांचे शेणही राहणार नाही. पाण्याची बाटली वीस रुपये आणि दूध अठरा रुपयांनी विकायची वेळ आल्याने शेतकऱ्यांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ...

ठळक मुद्दे‘गोकुळ’च्या निर्णयावर कमालीचा संताप; उत्पादन खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे. उत्पादनखर्च पाहता आता हातात जनावरांचे शेणही राहणार नाही. पाण्याची बाटली वीस रुपये आणि दूध अठरा रुपयांनी विकायची वेळ आल्याने शेतकऱ्यांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधनाची आकडेवारी पाहिली तर पूर्वी म्हैसवर्गीय जनावरांची संख्या अधिक होती पण अलीकडील दहा-पंधरा वर्षांत गायींची संख्या कमालीची वाढलेली दिसते. शेती व्यवसाय आतबट्ट्यात आल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायाकडे वळले. सुरुवातीच्या टप्प्यात म्हशीच्या दुधाला गायीच्या तुलनेत चांगला दर होता, त्यामुळे तुलनेने गायीचे दूध कमी होते. दुधाची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत होत गेल्यानंतर सर्वच दूध संघांनी दूध संकलन वाढीवर भर दिला.

म्हशीबरोबर गायीचे दूधवाढीसाठी विविध प्रोत्साहनपर कार्यक्रम हाती घेतल्याने दुधात झपाट्याने वाढ झाली; पण म्हशीच्या किंमती आणि तिचा भाकड काळामुळे शेतकरी तुलनेने कमी भाकड काळ असणाºया गायीकडे वळला. ‘गोकुळ’सारख्या दूध संघाने तर ‘वासरू संगोपन’ योजना राबवून जातिवंत दुभती जनावरे शेतकºयांच्या गोठ्यातच तयार करण्यास सुरुवात केली. या योजनेमुळे दुभत्या जनावरांची संख्या कमालीची वाढली, परिणामी दूधही वाढले. यामध्ये गाय दुधाने म्हशीशी बरोबरी केली. गाय दुधाची विक्री कमी होत असली तर उपपदार्थ व पावडरसाठी वापर केला जात असल्याने दूध संघानेही चांगला दर देण्यास सुरुवात केली; पण अलीकडे पावडरचे दर पडल्याने गायीचे दूध अतिरिक्त होऊ लागले. त्यामुळे दूध संघांनी दर कमी करण्याचा सपाटा लावला.

‘गोकुळ’ने दोनवेळा गाय दूध खरेदी दरात कपात केल्याने उत्पादक सैरभैर झाले आहेत. एकाबाजूला वाढत्या महागाईने दुधाचा उत्पादनखर्च वाढत असताना दुसºया बाजूला दर मात्र कमी होत असल्याने हा व्यवसाय शेतकºयांच्या हाताबाहेर गेला आहे. ‘गोकुळ’ने आजपासून कार्यक्षेत्रातील दूध २३ रुपये तर कार्यक्षेत्राबाहेर दूध १८ रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकºयांचे पुरते कंबरडे मोडणार आहे. महागलेले पशुखाद्य, वाळलेल्या वैरण व पशुवैद्यकीय सेवेने गाय दूध उत्पादक आता कमालीचा संकटात सापडणार आहे. बाजारात कंपन्यांची पाण्याची एक लिटरची बाटली वीस रुपयाला मिळते आणि दूध अठरा रुपयांनी विकायची वेळ शेतकºयांवर आली आहे.खरेदी-विक्रीत २४ रुपयांची तफावत‘गोकुळ’ कार्यक्षेत्रातील दूध २३ रुपयांनी तर बाहेरील दूध १८ रुपयांनी खरेदी करणार आहे; पण त्याची विक्री ४२ रुपयांनी करणार आहे. प्रतिलिटर १९ ते २४ रुपयांची तफावत आहे. खरेदीपेक्षा दुप्पट दराने विक्री करून संघ तोट्यात कसा? असा सवाल उत्पादक करत आहेत. 

गायी विका म्हणून तरी सांगा!‘गोकुळ’ला ज्यावेळी दुधाची गरज होती, त्यावेळी आम्हाला गायी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता ‘अतिरिक्त दुधा’च्या नावाखाली सहा महिन्यांत चार रुपयांनी दर कमी करून शेतकºयांचा विश्वासघात केला. तुम्हाला दूधच नको असेल तर थेट गायी विका म्हणून तरी सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया उत्पादकांमधून व्यक्त होत आहेत.हा घ्या उत्पादकाचा एका लिटरचा ताळेबंदपशुवैद्यकीय विभागानुसार पशुखाद्य (अर्धा किलो शरीर पोषण + ३०० ग्रॅम दुधासाठी)- १५.३६ रुपयेओली वैरण (४ किलो)- १२ रुपयेवाळलेली वैरण (१ किलो)- ९ रुपयेएकूण खर्च- ३६.३६ रुपये१ लिटर दुधाची किंमत- २३ रुपये (कार्यक्षेत्रात) १८ रुपये (कार्यक्षेत्राबाहेर)तोटा- १३.३६ रुपये (शेतकºयाची राबणूक सोडून)दृष्टिक्षेपात राज्यातील गाईचे दूधखासगी सुरू असलेले दूध संघ : २०सहकारी दूध संघ : ८६प्रतिदिन उत्पादन : २ कोटी ८० लाख लिटरत्यांपैकी ८० टक्के दूध हे गाईचेसरासरी विक्री दर :४० रुपयेसरासरी खरेदी दर :१९ रुपये

टॅग्स :milkदूधkolhapurकोल्हापूर