मायलेक - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:27 AM2021-09-23T04:27:27+5:302021-09-23T04:27:27+5:30

‘ताईबायऽ मला ती ताईबाय म्हणायची. लहानपणापासून तर.. ताईबाय - आईला जरा समजावा ना माझ्या लग्नाची तिला किती घाई झालीय ...

Milek - Part 2 | मायलेक - भाग २

मायलेक - भाग २

Next

‘ताईबायऽ मला ती ताईबाय म्हणायची. लहानपणापासून तर.. ताईबाय - आईला जरा समजावा ना माझ्या लग्नाची तिला किती घाई झालीय बघा. सारखं सगळीकडे वरसूचक मंडळांना सांगत रहाते. मला खरं सांगू ताई-बाय, मला मुळीच लग्नच करायचे नाहीय- मला आईला एकटं टाकून जायचेच नाही मुळी - ती एकटी राहणार आणि मी दुसरीकडे तिच्याशिवाय राहू तरी शकेन का - मला कल्पनाच करवत नाही हो - प्लीज सांगा ना- आता आईला काय कमी आहे - मस्त मजेत घरात रहायचे. तर हे लग्नाचं खूळच डाेक्यात घेऊन बसलीही बघा तर... सांगला ता तिला समजावून...? हां.. कसं माझ्या डोळ्यात बघणारी रमा मला अजून आठवतेय.

उच्चशिक्षणाने.... संस्कारित... शुद्ध विचार वाणी मनाने ठाम असलेली रमा खरंच सुंदर तर होती शिवाय बुद्धिमत्तेने उच्च विचाराने तेजस्वीही होती. आपले मत ठामपणे सांगण्याची तिची पद्धत.. सुशिक्षित मन-बुद्धी सगळंच काही दिसून येत होतं. तिचं जग.. विश्व फक्त फक्त रमाच होतं. बाकी तिला काहीच दिसत नव्हतं.. खूप गप्पा मारून जाणाऱ्या रमाच्या पाठीवर लोळणाऱ्या लांबलचक वेणीचा हलकासा जोका, चालण्याची आत्मविश्वासाची ढब, बोलण्यातली दृढता - चेहऱ्यावरचं.. स्मित... नि डोळ्यांतील, नजरेतील बुद्धिमत्तेची चमक-तजेला सगळच ठळक नजरेनं उलटलेले... तिचा फोटोही पेपरमध्ये झळकलेला - राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप मिळवलेल्या रमाचा विजयोत्सवातील हसमुख चेहरा नजरेआड होत नव्हता. मास्टरमध्ये अव्वल स्थानावर येऊन आता रमा कॉलेजमध्ये प्रोफेसर झाली होती. शिवाय खेळातही तिचा सराव चालूच राहिला. तुळशी आता तर बहुतेक दिवस... घरातच राहू लागली. वयोमानानुसार व्याधी जडलेल्या.. नि त्यातच रमाला नवरा कसा मिळेल.... जावयाबद्दल विचार करत राहायची ती..... मी अशीच दुपारी निवांत बसलेले- नि दारात- रमाचा बॅडमिंटनचा कोच. - माधवन उभा - उंचापुरा- देखणा-स्मार्ट-सावळा-मस्त हसमुख चेहरा झळकत होता. अगदी अदबीने आत येऊ का ताईबाय केवढं ते आर्जव, नम्र वाणी... शुभ्र दंतपक्तीत लाघवी हसणठ बोलणं - पटकन दुसऱ्यावर छापच पडत होती. त्याच्या एकंदर येण्याने... अस्तित्वाने सारा परिसरच आनंदमयी होऊन गेलेला.. माझी परवानगी घेऊन स्थानापन्न झाल्यावर माधवन बोलू लागला- कशा शशत मास्टर केलेलं... डॉक्टरेटची तयारी चालू आहे. घरची.. थोडक्यात माहिती देऊन झाल्यावर त्याने मला रमा आवडते. मी तिच्याशी लग्न करणार आहे तसं.. ताई-बाय मी रमाच्या आईला... सगळं सविस्तर सांगितलं आहेच.. पण त्यांच्या म्हणण्यानुसार तुमच्याकडे तुमची परवानगी घ्यायला आलोय.. तरी तुमच्याकडे तुमची परवानगी घ्यायला आलोय... तरी.. तुमच्यापुढे रमाशी लग्न करण्याचा माझा प्रस्ताव मांडत आहे - तुमचा आशीर्वाद असावा.. वगैरे... बराच वेळ त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्प झाल्यावर मी उठले... त्याच्याशी स्मित केलं... त्याला तुळशीला भेटते.. बोलते.. सर्व काही ठिक होईल.. आश्वासन देताच त्यानेही हसतमुखाने निरोप घेतला..

Web Title: Milek - Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.