शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’ला हवी आणखी ३०० हेक्टर जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:33 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नवीन उद्योगांसह सध्या कार्यान्वित असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) ३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे.राज्यातील उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी सरकारच्या उद्योग विभागाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे फेब्रुवारीमध्ये ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषद घेतली. त्यामध्ये विविध कंपन्या, उद्योजकांनी नवे उद्योग सुरू करणे, ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नवीन उद्योगांसह सध्या कार्यान्वित असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) ३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे.राज्यातील उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी सरकारच्या उद्योग विभागाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे फेब्रुवारीमध्ये ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषद घेतली. त्यामध्ये विविध कंपन्या, उद्योजकांनी नवे उद्योग सुरू करणे, सध्या कार्यान्वित असलेल्या उद्योगांच्या विस्तारासाठी एमआयडीसी आणि उद्योग केंद्रांसमवेत सामंजस्य करार केले आहेत. याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी एमआयडीसीसमवेत १२७ सामंजस्य करार झाले आहेत. त्यांतून हजारो कोटींची गुंतवणूक आणि चार हजार ८३४ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या १२७ उद्योगांमध्ये फौंड्री आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित उद्योग आहेत. करार केलेल्या उद्योगांना आणि सध्या कार्यान्वित असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी जिल्ह्यात ३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. या आवश्यकतेच्या तुलनेत एमआयडीसीकडे जागा उपलब्ध नाही. औद्योगिक क्षेत्राची वाढ करण्याच्या उद्देशाने विकासवाडी येथे २६५ हेक्टरमध्ये औद्योगिक वसाहत करण्याचा प्रस्ताव सन २०१४ मध्ये पुढे आला. या वसाहतीसाठी विकासवाडी, कणेरीवाडी, नेर्ली आणि कागलच्या हद्दीतील भूसंपादन केले जाणार होते. त्यासह ७० हेक्टर इतक्या सरकारी जमिनीचा वापर केला जाणार होता. मात्र, या परिसरातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विकासवाडी औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव बारगळला आहे. (उत्तरार्ध)भूसंपादन ठप्पविकासवाडी (ता़ करवीर), अर्जुनी (ता़ कागल) आणि अतिरिक्त शिरोली औद्योगिक क्षेत्र, येथे उद्योग उभारणीसाठी आवश्यक जमिनी आहेत़ अर्जुनी येथे २४७ एकर, तर विकासवाडी येथे २६५ एकर जमीन आहे़ या क्षेत्रातील भूसंपादनास स्थानिक लोकांनी विरोध केला. यातील अर्जुनी येथील भूसंपादन रद्द केले. उद्योग उभारणीसाठी ‘एमआयडीसी’कडे किमान ३५० ते ४०० एकर जमीन साठा (स्टॉक) स्वरूपात असणे आवश्यक असते़. पण, विरोध होत असल्यामुळे नवीन उद्योगांना जागा देणे अडचणीचे ठरत आहे.रिक्त भूखंडांचा पर्यायअर्जुनी येथील भूसंपादन रद्द केले आहे. विकासवाडीमधील प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे ‘एमआयडीसी’ला नवीन जागा उपलब्ध झाली नसल्याचे ‘एमआयडीसी’चे उपप्रादेशिक अधिकारी अशोक चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, नवीन उद्योग आणि विस्तारीकरणासाठी जागेची मागणी होत आहे. मात्र, त्या तुलनेत एमआयडीसीकडे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतील रिक्त, अविकसित भूखंड ताब्यात घेऊन ते नवीन उद्योग अथवा विस्तारीकरणास उपलब्ध करून देण्यात येत आहेत.