शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेरी वेदर’ प्रतिष्ठेचा प्रश्न राजकीय रंग : प्रदर्शनाला विरोधासाठी क्रीडापे्रमींचे आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:40 IST

कोल्हापूर : मेरी वेदर मैदानावरील खासदार धनंजय महाडिक यांच्या ‘भीमा कृषी प्रदर्शन २०१८’ला राजकीय रंग चढला असून, हे कृषी प्रदर्शन आता महाडिक-पाटील या दोन्हीही

कोल्हापूर : मेरी वेदर मैदानावरील खासदार धनंजय महाडिक यांच्या ‘भीमा कृषी प्रदर्शन २०१८’ला राजकीय रंग चढला असून, हे कृषी प्रदर्शन आता महाडिक-पाटील या दोन्हीही गटांकडून प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. दरम्यान, या परिसरात खेळोत्तर कारणांसाठी कोणतेही दुसरे मैदान उपलब्ध नसल्याने हा विषय राजकीय न बनविता हे मैदान फक्त खेळासाठीच उपलब्ध करून द्यावे व सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पसिरातील खेळाडूंनी गुरुवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.

हे मैदान खेळाडूंसाठीच आरक्षित राहावे यासाठी खेळाडूंनी आयुक्त डॉ. चौधरी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. तसेच शासन आदेशाने हे मैदान १९ सप्टेंबर १९८० रोजी हस्तांतरित झाले आहे; त्यामुळे त्याची मालकी कोल्हापूर महापालिकेकडे आहे. शासन आदेशामध्येही खेळाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी या मैदानाचा वापर न करण्याची अट शासनाने घातली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंग न देता खेळाडूंचा विचार करून हे मैदान फक्त खेळासाठीच उपलब्ध करून द्यावे, तसेच खेळाव्यतिरिक्त अन्य प्रदर्शनांसाठी अगर व्यावसायिकतेसाठी अन्य ठिकाणी मैदान राखीव ठेवावे, अशीही मागणी क्रीडाप्रेमींनी पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय प्रदर्शनासाठी हे मैदान दिल्यानंतरचा यापूर्वीचा अनुभव वाईट असून, मैदानातील खड्डे बुजविण्याचे काम खेळाडूंना करावे लागते.

यावेळी माजी उपमहापौर अर्जुन माने, खेळाडू संजय साळोखे, जमील अथणीकर, शीतल कदम, मिलिंद देसाई, संग्राम सरनोबत, निवास वाघमारे, माणिक ठाकूर, बाजीराव कुंभार, सागर पोतनीस, रविराजशिंदे, प्र्रकाश जगदाळे, आदी उपस्थित होते.ठरावास सर्वच गटनेते सूचक-अनुमोदकमेरी वेदर मैदान आणि सासने मैदान खेळाव्यतिरिक्त कशासाठीही देऊ नये, असा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत २० मार्च २०१७ रोजी करण्यात आला आहे. ठराव सूचक म्हणून शारंगधर देशमुख व सुनील पाटील, तर अनुमोदक म्हणून विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम आणि विरोधी किरण शिराळे हे आहेत. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला महापालिकेने परवानगी नाकारली. त्यातच स्वप्निल शेवडे या नावाने मेरी वेदर मैदान यापूर्वीच २० ते ३० जानेवारीदरम्यान क्रिकेटच्या स्पर्धेसाठी बुक केले आहे. 

स्वप्निल शेवडेचा शोध सुरूमेरी वेदर मैदान दि. २० ते ३० जानेवारी दरम्यान स्वप्निल शेवडे या व्यक्तीच्या नावे क्रिकेट सामने घेण्यासाठी १० हजार रुपये जमा करून नोंदित केले आहे. पण शेवडे याचा पत्ता अगर काही ठावठिकाणा इस्टेट विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समजते. या शेवडेचा शोध महाडिक समर्थक घेत होते; पण त्यांनाही शेवडेबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.मेरी वेदर मैदानावरच कृषी प्रदर्शनगेल्या आठ दहा वर्षांपासून मेरी वेदर मैदानावरच खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारने भीमा कृषी प्रदर्शन भरवले जात आहे. यंदाही या मैदानावरच प्रदर्शन घेण्यासाठी महाडिक गटाकडून आता प्रतिष्ठेचा विषय केला जात आहे. याच मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यासाठी महसूल विभागाच्या सचिवांपर्यंत यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यासाठी काही मंत्र्यांनीही हस्तक्षेप करून त्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.