शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी खून प्रकरण : इचलकरंजीत ४८ तास व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:11 IST

इचलकरंजी येथील व्यापारी तरुणाच्या खून प्रकरणाचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ४८ तास आपला व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय महेश सेवा समितीमध्ये झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देव्यापारी खून प्रकरण : इचलकरंजीत ४८ तास व्यापार बंद ठेवण्याचा निर्णयमहेश सेवा समितीतील बैठकीत घोषणा

इचलकरंजी : येथील व्यापारी तरुणाच्या खून प्रकरणाचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ४८ तास आपला व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय महेश सेवा समितीमध्ये झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, येत्या ३६ तासांत तपास पूर्ण करून संशयितांना अटक केली जाईल. त्यासाठी विविध सहा ठिकाणी पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.घाडगे म्हणाले, कोणत्याही कारणातून खुनासारखी घटना घडणे, ही बाब निंदनीय आहे. मात्र, अशा घटना घडूच नयेत, यासाठीही आपणाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. अनेकवेळा व्यापारी सकाळी तक्रार सांगतात आणि सायंकाळी तक्रार नाही म्हणतात. त्याचबरोबर आपले दुकान, पेढी, घर याठिकाणी सीसीटीव्ही लावून अनेक प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी अथवा उघडकीस येण्यासाठी आपण पोलिस प्रशासनाची मदत करू शकतो. त्याचबरोबर स्वत:च्या सुरक्षिततेसाठीही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक वेळी व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये तसे आवाहन केले आहे. त्याला व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही.

शहरातील चौदा टोळ्यांना मोक्का लावून त्या माध्यमातून १०२ संशयित आरोपींना गजाआड केले आहे. त्यातूनही जे अद्याप बाहेर आहेत, त्यांच्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवून पोलिस आपले कर्तव्य बजावतील. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अपप्रवृत्तीविरोधात पुढे येवून अशा घटना घडण्याआधीच रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यापारी व उद्योजकांच्या पाठीशी सरकार ठामपणाने उभे आहे. अशा घटना तसेच खंडणी, धमकी असे प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस दलाला शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाया सुरू केल्या आहेत. व्यापाऱ्यांनी निर्भयपणे आपला व्यवसाय करावा, असे आवाहन केले.यावेळी सचिन झंवर, लक्ष्मीकांत मर्दा, उत्तम आवाडे, घनश्याम इनानी, आदींनी मनगोत व्यक्त केले. बैठकीस भीमकरण खटोड, रामपाल भंडारी, नंदकिशोर भुतडा, ब्रिजमोहन काबरा, रामलाल मुंदडा, भीमकरण छापरवाल, सतीश डाळ्या, नितीन धूत, सुनील महाजन, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर