शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा संप मागे;

By admin | Updated: July 14, 2016 00:43 IST

बाजार समिती आजपासून सुरू

कोल्हापूर : राज्य शासनाने पणन कायद्यात सुधारणा करून कांदा-बटाटा, फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्याने व्यापाऱ्यांनी सोमवार (दि. ११)पासून सुरू केलेले काम बंद आंदोलन बुधवारी रात्री मागे घेतले. व्यापारी महासंघ व राज्य शासनाच्या प्रतिनिधींची मुंबईत बैठक झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे आज, गुरुवारपासून व्यवहार सुरू होईल. आज सकाळी ११ वाजता व्यापाऱ्यांनी पुढील दिशा निश्चित करण्यासाठी बैठक बोलविली आहे. तीन दिवस बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने त्याची गंभीर दखल घेतली. शेतकरी बाजार समितीत आले तर त्यांच्या मालाच्या विक्रीची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी समित्यांना दिले होते. त्यामुळे संचालक मंडळ जागे झाले. कोल्हापूर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत या आदेशाची चर्चा झाली. व्यापारी असोसिएशनची मुंबईत चर्चा सुरू आहे, त्यातून मार्ग निघेल, असे व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळंजू व सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. प्रथम बाजारपेठ सुरू करा आणि मग चर्चा सुरू ठेवा, अशी भूमिका सभापती परशराम खुडे व उपसभापती विलास साठे यांनी घेतली. बंद थांबवा : ११० व्यापाऱ्यांना नोटिसा बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरणे थांबवून पूर्ववत व्यवहार सुरू करा; अन्यथा परवाना रद्द करण्यात येईल, अशा नोटिसा बुधवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने ११० कांदा-बटाटा, फळे-भाजीपाला व्यापाऱ्यांना लागू केल्या होत्या. सरकारच्या पातळीवरून समितीच्या प्रशासनावर दबाव असल्याने संचालक मंडळाने तातडीने बैठक घेऊन व्यापाऱ्यांवर कारवाईचे हत्यार उपसले. (प्रतिनिधी)