शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

चेनस्रॅचरचे आता पुरुष टारगेट

By admin | Updated: August 23, 2014 00:09 IST

बनावट दागिण्यांमुळे पवित्रा : सोन्याची चेन, बे्रसलेटची होतेय चोरी

एकनाथ पाटील - कोल्हापूर --शहरात ‘चेन स्नॅचर्स’च्या धुमाकुळाने महिलांबरोबर आता पुरुषांचेही जीवन असुरक्षित बनले आहे. चेन स्नॅचरच्या भीतीने महिला बाहेर पडताना अंगावरती बनावट दागिने घालत असल्याची चाहूल चोरट्यांना लागल्याने त्यांनी आता हातामध्ये आणि गळ्यामध्ये किंमती दागिने घालून रुबाब मारणाऱ्या पुरुषांना लक्ष केले जात आहे. रस्त्यावर अडवून ओळखीचा बनाव करून त्यांना लुटले जात आहे; तर मोटारसायकलवरून धूम स्टाईलने गळ्यातील सोन्याची चेन हातोहात लंपास केली जात आहे. या भयावह प्रकारामुळे पोलीसही हैराण झाले आहेत. रोजच्या होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या गुन्हे विभागाने या गुन्ह्यांकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांचा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला असून, त्यानुसार ठरावीक वार व वेळांना सर्वाधिक सोनसाखळी चोऱ्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सोमवार, बुधवार आणि शनिवार यांचा समावेश आहे. तर पहाटे सहा ते नऊ व सायंकाळी चार ते नऊ या वेळेत ते संधी साधत असल्याचे चित्र पुढे येत आहे. त्याचप्रमाणे पन्नास वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिला लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मोटारसायकलवरून येणारे चोरटे शहराच्या कोणत्याही भागांमध्ये रस्त्याने एकटी पायी जात असलेल्या महिलेच्या जवळ येतात व काही कळण्यापूर्वी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणात पोबारा करतात. अशा प्रकारच्या घटना शहरात दररोज होत असल्याने महिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सध्या चोरट्यांच्या भीतीने घराबाहेर पडताना महिला बनावट दागिने घालून बाहेर पडत आहेत. त्याची चाहूल चोरट्यांना लागली आहे. त्यामुळे त्यांनी आपली नजर आता पुरुषांभोवती लक्ष केली आहे. काही हौशी पुरुष गळ्यामध्ये चेन, लॉकेट व हातामध्ये ब्रेसलेट घालून मिरवताना पाहायला मिळतात, अशा पुरुषांना हेरण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून होऊ लागला आहे. चित्रपट गृह, बसस्थानक, महाविद्यालय परिसर, मार्केट परिसर, पर्यटन स्थळ, आदी ठिकाणी हे चोरटे हेरेगिरी करून संधी मिळताच डाव साधून घेतात. एकटे-दुकटे गाठून भर रस्त्यांमध्ये महिलेची किंवा युवतीची छेड काढली आहेस, तुला ठार मारण्याची आम्हाला सुपारी मिळाली आहे, असे सांगून त्यांना लुटले जाते. अनेक घटना घडूनही बदनामी नको म्हणून पुरुष पोलीस ठाण्याची पायरी चढलेले नाहीत. महिन्यापूर्वी हुपरीतील चांदी व्यापाऱ्याला असाच लुटण्याचा प्रकार घडला होता. तर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन ते चार घटना फोर्ड कॉर्नर परिसरात घडल्याने पोलीसह हैराण झाले आहेत. पोलिसांच्या हातावर तुरीक्राईम बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील चेन स्नॅचर, लुटारूंचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार ज्या-त्या पोलीस ठाण्यांकडून एक-एक तासाच्या अंतराने परिसरात पेट्रोलिंग केले जात आहे. पोलीस रस्त्यावर उतरूनही चेन स्नॅचर मात्र हातावर तुरी देऊन पसार होताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वी शिवाजी चौकात एका पुरुषाच्या गळ्यातील चेनला हिसडा मारून लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांचा पोलिसांनी पाठलाग केला. अखेर चोरटे धूमस्टाईलने पसार झाले.