शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

‘मेनन’च्या कामगारांना वेतनवाढ

By admin | Updated: December 4, 2014 00:45 IST

चार हजार ७०० ची वाढ : साडेतीन वर्षांचा झाला करार

कोल्हापूर : विक्रमनगर येथील मेनन अ‍ॅण्ड मेनन लिमिटेडमधील व्यवस्थापन आणि कामगार संघटनेमध्ये साडेतीन वर्षांसाठीच्या वेतनवाढीचा करार झाला. या करारानुसार कामगारांना प्रत्येकी मासिक सरासरी ४ हजार ७०० इतकी वेतनवाढ देण्यात आली आहे. मंदीची स्थिती असूनही वेतनवाढ झाल्याने कामगारांमध्ये उत्साह पसरला आहे. या करारात उत्पादनाशी निगडित २ हजार ४५० इतकी रक्कम व्हेरिएबल पेमेंट म्हणून देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त उत्पादनाशी निगडित फायदे सरासरी २ हजार ५० इतकी रक्कम बेसलाईन पेमेंट म्हणून निश्चित केली आहे. मूळ वेतनवाढीच्या व्यतिरिक्त अन्य भत्त्यांमध्येदेखील वाढ करण्यात आली आहे. शांततेत आणि मुदतीपूर्व करार झाला आहे. करारात कामगार कल्याणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कामगाराची व त्यांच्या पत्नीची मेडिक्लेम पॉलिसी उतरविण्याची तरतूद केली आहे. कराराचे फायदे १ डिसेंबर २०१४ पासून पुढील साडेतीन वर्षांसाठी राहणार आहेत. करारावर मेनन अ‍ॅण्ड मेननचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विजय मेनन, कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांच्या स्वाक्षरी आहेत. कराराच्या प्रक्रियेत कामगार संघटनेनेकडून जॉनी देसाई, एस. एस. यादव, एस. एस. हेर्लेकर, टी. ए. माळी, बी. बी. यादव, व्ही. एस. परीट, तर व्यवस्थापनाकडून एचआरचे जनरल मॅनेजर उल्हास चंद्रात्रे, संजय बुरसे, विवेक हरिदास, शशिकांत हाळदकर, सुहास खडके आदी सहभागी झाले होते. करारावरील स्वाक्षरीवेळी रमेश सबनीस, अरविंद तुराखिया आदी उपस्थित होते. करारानंतर कामगारांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करून जल्लोष केला. (प्रतिनिधी)