शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘तपोवन’वर रंगले ‘आठवणीतील खेळ ’

By admin | Updated: December 26, 2015 00:13 IST

आबालवृद्धांनी लुटला आनंद : गोट्या...विटी-दांडू... खो-खो... पळापळी... धावरिंग... गलोरी... अशा पारंपरिक खेळांची रेलचेल

कोल्हापूर : गोट्या...विटी-दांडू... खो-खो... पळापळी... धावरिंग... गलोरी... सूरपारंब्या... ढकलगाडी... टायर पळविणे... अशा पारंपरिक खेळांचा आनंद शुक्रवारी सकाळी आबालवृद्धांनी लुटला. निमित्त होत... कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘आठवणीतील शाळा’ या उपक्रमाचे.तपोवन मैदानावर आज, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता ही शाळा सुरू झाली. त्यामध्ये सहभागी झालेली मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आपल्याला आवडते पारंपरिक खेळ खेळायला सुरुवात केली. कोण विटी-दांडू खेळतोय, तर कोण ढकलगाडीवर बसून मैदानावर फेरफटका मारतोय...तर कोणी हातात धावरिंग घेऊन गोल रिंगण घालतोय...असे खेळ खेळता लहानांसोबत ज्येष्ठही लहान झाल्याचे दिसले. दुपारपर्यंत ही शाळा सुरू होती. सोबत आणलेली शिदोरी म्हणजे जेवणाचे डबे हे एकत्रितपणे सर्वांनी खाऊन एकत्र खेळासोबत एकत्र जेवण्याचाही मनसोक्त आनंद लुटला. दुपारपर्यंत सुरू असलेल्या या शाळेत कोल्हापूरसह सांगली, कऱ्हाड, सातारा येथील चारशेहून अधिकजण सहभागी झाले होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. ही शाळा तीन दिवस सुरू राहणार असून, त्याचे संयोजन सागर वासुदेवन, सागर बकरे, सचिन जिल्हेदार यांनी केले आहे.गोट्या, सूरपारंब्या, टायर पळविणे, रस्सीखेच, रुमाल पळविणे, विटी-दांडू, भोवरा, खो-खो., ढकलगाडा, धावरिंग, आईचे पत्र हरविले, गलोरी, मातीची रास, असे अनेक पारंपरिक खेळ खेळून अबालवृद्धांनी आनंद लुटला.मोबाईलच्या जमान्यातया खेळांची गरजमोबाईल, व्हॉटस् अ‍ॅपच्या जमान्यात या पारंपरिक खेळांची गरज आहे; परंतु ‘आठवणीतील शाळा’ या उपक्रमातून या जुन्या मैदानी खेळांना एक व्यासपीठ देऊन लहान मुलांना हे खेळ खेळण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळेल. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य व चांगला असल्याच्या प्रतिक्रिया आठवणीतल्या शाळेत सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या.आज मी लहान झालो...या शाळेत खेळायला आलेले जवाहरनगर येथील ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक मोहन आत्माराम शिरवडेकर यांनी मनसोक्त सर्व खेळ खेळले. हातात धावरिंग घेऊन ते एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीने मैदानावर पळत होते. त्याबरोबरच विटी-दांडू, रस्सीखेच असे खेळ खेळून ते यामध्ये दोनवेळा जिंकलेही. आज माझ्या जुन्या आठवणी जाग्या होऊन या लहान मुलांमध्ये मीही लहान झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.सध्या कॉम्प्युटर, मोबाईलच्या जमान्यात मुले पारंपरिक खेळ विसरली आहेत. त्यांना या खेळांची माहिती व्हावी, तसेच या मातीतील खेळांमुळे त्यांचा या मातीशी स्पर्श होऊन ही पिढी सुदृढ होण्यासाठी ‘आठवणीतील शाळे’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. या शाळेत सर्व मुले मनसोक्त आनंद लुटत असल्याचे समाधान होत आहे.- सागर वासुदेवन(आयोजक, आठवणीतील शाळा)