शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलंडमध्ये साकारणार कोल्हापूरच्या मैत्रीचे स्मारक : अ‍ॅडम बुरक्वोस्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:54 IST

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे नागरिक अडचणीत असताना कोल्हापूरने त्यांना केवळ आश्रय नव्हे तर उत्तम सेवा सुविधा दिल्या. पोलंड आणि कोल्हापूरचे हे जिव्हाळ््याचे नाते, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध आणखी दृढ करण्यासाठी पोलंडमध्ये स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबतची दिशा १० ते १४ सप्टेंबर दरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात स्पष्ट होईल अशी माहिती पोलंडचे राजदूत अ‍ॅडम बुरक्वोस्की यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देपोलंडमध्ये साकारणार कोल्हापूरच्या मैत्रीचे स्मारक : अ‍ॅडम बुरक्वोस्कीसप्टेंबरमध्ये पोलंडचे राष्ट्राध्यक्ष कोल्हापुरात येणार

कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे नागरिक अडचणीत असताना कोल्हापूरने त्यांना केवळ आश्रय नव्हे तर उत्तम सेवा सुविधा दिल्या. पोलंड आणि कोल्हापूरचे हे जिव्हाळ््याचे नाते, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध आणखी दृढ करण्यासाठी पोलंडमध्ये स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबतची दिशा १० ते १४ सप्टेंबर दरम्यान राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यात स्पष्ट होईल अशी माहिती पोलंडचे राजदूत अ‍ॅडम बुरक्वोस्की यांनी मंगळवारी दिली.दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आश्रय दिला. त्यांच्यासाठी वळीवडे येथे कॅम्प उभारून सर्व सेवा सुविधा पुरवण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात त्या घटनेला ८० वर्षे पूर्ण होत आहेत.

न्यु पॅलेस येथे शाहू छत्रपती यांनी पोलंडचे राजदूत अ‍ॅडम बुरक्वोस्की यांना राजर्षी शाहू महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला. (छाया : आदित्य वेल्हाळ) 

यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी पोलंडच्या राष्ट्रपतींना सप्टेंबर महिन्यात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी पोलंडचे राजदुत पोलंडचे राजदूत अ‍ॅडम बुरक्वोस्की आणि उच्चायुक्त डेमियन आयरझिक, इवा स्टॅनक्यु, रॉबर्ड डेझीडिस्क हे अधिकारी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.

महावीर उद्यान येथे शांतीदूत स्तंभाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार संभाजीराजे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कर्नल विजयसिंह गायकवाड, कॅप्टन शिवाजी महाडकर, रविराज निंबाळकर उपस्थित होते.खासदार संभाजीराजे म्हणाले, ब्रिटीश भारतात व्यापार करण्यासाठी आले आणि त्यांनी देशावर राज्य केले. परत जाताना ते आपल्या दृष्टीने शत्रूच राहिले. पण पोलंडचे नागरिक येथे आश्रयाला आले. कोल्हापूर आणि जामनगर या दोनच संस्थानांनी त्यांना आधार दिला. हे पोलंडवासिय कोल्हापूरच्या मातीत रु ळले, जगले आणि परत जाताना आपले मित्र बनले. हा दोन देशातल्या मानसिकतेतला फरक आहे.दरम्यान, या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी वळीवडे कॅम्प, शिवाजी विद्यापीठ, सेंट झेविअर्स ताराराणी चौकाजवळील पोलिश स्मशानभूमीस भेट दिली. सप्टेंबरमध्ये पोलंडच्या राष्ट्राध्यक्षाच्या दौऱ्याचे नियोजन सध्या सुरू आहे.

कोल्हापूची मिरची आणि चप्पलकोल्हापूरमध्ये तुम्हाला काय आवडले यावर अ‍ॅडम म्हणाले, कोल्हापुरचे जेवण मला खूप आवडले कारण त्यात मिरची खूप असते आणि मला मिरची आवडली. इथले जेवण रुचकर आहे. कोल्हापुरी चप्पलही मी घेतली आहे.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर