शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

‘टेंभू’वरून खासदार-आमदारांत श्रेयवाद

By admin | Updated: February 6, 2016 00:12 IST

निविदेपूर्वीच कामाचे भूमिपूजन : खासदारांच्या साथीला उभारले कॉँग्रेसचे कार्यकर्ते

जगन्नाथ जगदाळे -- माहुली  --टेंभू योजनेच्या कामात आता श्रेयवाद सुरू झाला आहे. भिकवडी हद्दीत टेंभूच्या पाटाच्या दाराच्या भूमिपूजनावरून राजकारण सुरू झाले असले, तरी सध्या या दाराची अवस्था बाजारात तुरी.. अशीच आहे. त्यामुळे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी भूमिपूजन केलेल्या टेंभू योजनेच्या कालव्यावरील प्रवेशव्दारामुळे शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर व खा. संजयकाका पाटील यांच्यात श्रेयवाद उफाळून येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला माहुली परिसरातील कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने तो परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, चिखलहोळ गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ओढ्यात पाणी सोडण्यासाठी भिकवडी बुद्रुक हद्दीत आटपाडीकडे जाणाऱ्या टेंभूच्या कालव्यावर प्रवेशव्दार करून पाणी ओढ्यात सोडण्यासाठी या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, या कालव्यावर प्रवेशव्दार काढण्याचे नेमके ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच या कामाची निविदाही निघाली नाही. खासदार पाटील यांच्याहस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम मात्र धुमधडाक्यात झाला. कार्यक्रमाला माहुली, वलखडच्या कॉँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावून श्रेय मिळविण्याचा प्रयत्न केला. आमदार अनिल बाबर यांनाही भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी कॉँग्रेस गटाचे कार्यकर्ते आ. बाबर यांना भेटले होते. कामाची अजून निविदाच नसल्याने बाबर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्यास स्पष्ट नकार दिला. कॉँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार पाटील यांना भूमिपूजनाचा मान दिला. कार्यक्रमाला टेंभूचे अधिकारी, भाजपचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. खासदार संजय पाटील यांनीही घाईगडबडीने भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.‘टेंभूच्या कामासाठी मी रात्रंदिवस कार्यरत आहे. कामाची निविदा नसताना भूमिपूजन कशासाठी? भिकवडी बुद्रुक हद्दीत दार काढून वलखड, माहुली, चिखलहोळच्या ओढ्यात पाणी सोडण्याचा शब्द निवडणूक प्रचारातच मी दिला आहे. येथील दाराबरोबरच अजून एक ठिकाणी टेंभूच्या पाटाला दार काढण्याचे आहे. त्यामुळे निविदा निघाल्यानंतरच कामाचे भूमिपूजन होणार आहे’, असे आमदार बाबर यांनी सांगितले. दरम्यान, टेंभू योजनेच्या कामाचा श्रेयवाद अजूनही वाढणार आहे. श्रेयवादापेक्षा गटातटाचे राजकारण विसरून सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन टेंभू योजनेला गती देण्याचा प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. खासदारांनी केंद्र सरकारकडून, तर विद्यमान आमदारांनी राज्य सरकारकडून या कामासाठी भरीव निधी मिळविण्याचा प्रयत्न केला, तर पंधरा वर्षांपासून टेंभूच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येईल. टेंभू योजनेला अजून पोटपाटाची सोय नाही. खानापूर तालुक्याच्या हद्दीवरून पाणी आटपाडी, सांगोल्याकडे जाणार आहे. पण पाटाशेजारी असलेली गावेही अजून टेंभूच्या पाण्यापासून वंचित आहेत.पाण्यासाठी राजकारण न होता सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन ताकदीने योजना पूर्ण करण्याची गरज आहे. मात्र आतापर्यंत योजना पूर्णत्वापेक्षा गटा-तटाच्या राजकारणातून श्रेयवादासाठीच राजकीय नेत्यांची ताकद खर्ची पडल्याचे चित्र आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र टेंभूच्या पाण्याची आतुरता आहे.