शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी ‘मेगा ब्लॉक’

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

घोडावत ग्रुपच्यावतीने आंदोलन : तासभर रास्ता रोको; हजारोंची उपस्थिती; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करा, या मागणीसाठी संजय घोडावत ग्रुपच्यावतीने आज, मंगळवारी अंकली नाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले. उद्योगपती संजय घोडावत यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांसह व्यापारी, उद्योग समूहातील घटक आंदोलनात सहभागी झाले होते. येत्या जूनपर्यंत ठेकेदार कंपनीने काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली असून, त्यानंतरही काम पूर्ण न झाल्यास शासनच काम हाती घेऊन पूर्ण करेल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. आर. प्रभुणे यांनी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे एक तास झालेल्या आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अंकली नाक्यावर सकाळी पावणे अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करा, रस्त्यावरील खड्डे बनले मृत्यूचे अड्डे, शिरोली-सांगली रस्ता मरणासाठी, मग टॅक्सचा हट्ट कशासाठी, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी संजय घोडावत म्हणाले, या रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले असून, त्यांनी रत्नागिरी, नागपूर या कामांच्या अंतर्गत कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही काम सुरू नाही. हे काम रखडल्यामुळे अपघातांची संख्या प्रचंड वाढली असून, प्रवाशांचा नाहक वेळ, श्रम आणि पैसा वाया जात आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात दहा ते बारा हजार लोकांनी सहभाग घेतला आहे. हे काम जर वेळेत पूर्ण झाले नाही, तर आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविली जाईल. पूर्वीच्या व आताच्या सरकारने आश्वासने दिली. मात्र, त्या आश्वासनांना वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत. आता तरी शासनाला जाग येऊन रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. यावेळी मागण्यांचे निवेदन बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रभुणे यांना देण्यात आले. वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर येत्या जून २०१५ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे लेखी आश्वासन प्रभुणे यांनी घोडावत यांना दिले. आंदोलनात घोडावत इन्स्टिट्युटचे ट्रस्टी विनायक भोसले, अतुल शिंदे, विनोद घोडावत, श्रेणिक घोडावत, राजेंद्र नांद्रेकर, संजय मालू, दादा पाटील-चिंचवाडकर, राजेंद्र दार्इंगडे, गजाधर मानधना, विश्वास बालिघाटे यांच्यासह विद्यार्थी, उद्योजक सहभागी झाले होते.कशासाठी आंदोलनकोल्हापूर (शिरोली)-सांगली रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, जीव मुठीत धरून प्रवास करावालागत आहे. गेल्या चार वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आजअखेर काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण सध्या काम अपूर्ण आहे.खराब रस्त्यांमुळे जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील वाहनधारक वर्षाला २२५ कोटींचा रोड टॅक्स भरतात. ठेकेदार कंपनीकडून सुरू असलेले काम समाधानकारक नाही.रस्ता बांधणीकडे दुर्लक्ष झाल्याने औद्योगिक विकास खुंटला आहे.कशासाठी आंदोलनकोल्हापूर (शिरोली)-सांगली रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, जीव मुठीत धरून प्रवास करावालागत आहे. गेल्या चार वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आजअखेर काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण सध्या काम अपूर्ण आहे.खराब रस्त्यांमुळे जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील वाहनधारक वर्षाला २२५ कोटींचा रोड टॅक्स भरतात. ठेकेदार कंपनीकडून सुरू असलेले काम समाधानकारक नाही.रस्ता बांधणीकडे दुर्लक्ष झाल्याने औद्योगिक विकास खुंटला आहे.