शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

‘महासंग्राम’मध्ये फिक्सिंगचा आरोप शिवाजी पेठेत बैठक : पाच संघांची स्वतंत्र असोसिएशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:01 IST

शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या महासंग्राम फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी (दि. १६) होणारा अंतिम सामना ‘फिक्सिंग’ असल्याची चर्चा फुटबॉल शौकिनांत सुरू असल्याचा आरोप शिवाजी मंदिरात बुधवारी झालेल्या शिवाजी तरुण

कोल्हापूर : शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या महासंग्राम फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी (दि. १६) होणारा अंतिम सामना ‘फिक्सिंग’ असल्याची चर्चा फुटबॉल शौकिनांत सुरू असल्याचा आरोप शिवाजी मंदिरात बुधवारी झालेल्या शिवाजी तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, साईनाथ स्पोर्टस, संध्यामठ तरुण मंडळ, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत ‘शिवाजी पेठ फुटबॉल असोसिएशन’ स्थापण्याचा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीची माहिती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व उपाध्यक्ष अजित राऊत यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या २८ मेपासून सुरू असलेल्या महासंग्राम फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि. ८) शेवटचा सुपर लीगचा सामना ‘पाटाकडील’ व ‘बालगोपाल तालीम मंडळ’ यांच्यात झाला. तो ४० मिनिटे घ्यावयाचा असताना त्याचा पूर्वार्ध ३० मिनिटे व उत्तरार्ध २५ मिनिटांचा का झाला? या निर्णयावर के.एस.ए. व रेफ्री असोसिएशनने कोणती कारवाई केली..? त्यामुळे अशा गैरप्रकारांस आळा घालण्यासाठी सर्वांच्या मते ‘शिवाजी पेठ फुटबॉल असोसिएशन, ही संस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शनिवारी होणारा अंतिम सामना ‘फिक्स’ केल्याची चर्चा असून त्यात पीटीएम एक नंबर, तर बालगोपाल दोन नंबर अशी चर्चा असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित ऊर्फ पिंटू राऊत, सचिव महेश जाधव, सहसचिव सुरेश जरग, सदाभाऊ शिर्के, श्रीकांत भोसले, विशाल भोगम, अमित इंगळे, अतुल भालकर, शरद नागवेकर, संध्यामठ तरुण मंडळाचे पप्पू नलवडे, संदीप भोसले, ‘खंडोबा’चे जोतिराम जाधव, अरुण दळवी, दिलीप सूर्यवंशी, सोनू चौगुले, मनोज बालिंगकर, अमित इंगळे, फुलेवाडी क्रीडा मंडळाचे नगरसेवक राहुल माने, युवराज पाटील, प्रा. अभिजित वणिरे, साईनाथ फुटबॉल संघाचे गौरव माने, धीरज चौगले, माजी फुटबॉलपटू बाबूराव घाटगे, राजू भोईटे, जयवंत अतिग्रे उपस्थित होते.‘चंद्रकांत महासंग्राम’साठी शनिवारी अंतिम लढतकोल्हापूर : ‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची फुटबॉल स्पर्धा’ म्हणून गणल्या गेलेल्या ‘चंद्रकांत फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेतील पाटाकडील तालीम मंडळ (अ) व बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील अंतिम सामन्याचा थरार शनिवारी (दि. १६) दुपारी चार वाजता फुटबॉल रसिकांना पाहण्यास मिळणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर २७ मे पासून ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धेच्या अंतिम सामना रविवारी (दि. १०) जूनला होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. पावसाने उघडीप दिल्याने आता हा सामना शनिवारी दुपारी होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास ५ लाख ११ हजार, तर उपविजेत्या संघास ३ लाख ११ हजार व ‘मालिकावीरा’स बुलेट, चाहत्यांमधून दोन लकी कुपनद्वारे पुरुष प्रेक्षकांना मोटारसायकल, तर महिला प्रेक्षकांना दुचाकी संयोजकांच्यावतीने भेट दिली जाणार आहे.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर