पट्टणकोडोली येथील आयसोलेशन कोविड सेंटरला आज प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी भेट दिली. या वेळी प्रांताधिकारी खरात यांनी रुग्णांची चौकशी, सेंटरचे नियोजन याबाबत आढावा घेऊन संयोजकांचे कौतुक केले. तसेच सेंटरमध्ये काम करणार्यांनीही स्वत:ची काळजी घ्यावी, अशी सूचना दिली. या वेळी उपसरपंच अंबर बनगे यांनी हे सेंटर लोकसहभातून चालवण्यात येत असून, रुग्णांना दररोज डॉक्टरांकडून तपासणी, जेवण, नाष्टा व राहण्याची सोय केली असल्याचे सांगितले. तर पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांनी रुग्णांना लागणारी महागडी औषधेही मोफत दिली जात असल्याची माहिती दिली. या वेळी मंडल अधिकारी अरुण पुजारी, तलाठी महेश नागरगोजे, सदस्य बिरू कुशाप्पा, सुरेश भोजे, इरफान मुजावर, सुहास कदम व शरद पुजारी उपस्थित होते. दरम्यान डॉ. सुदर्शन कोळी, डॉ. अनुप पाटील, डॉ. राहुल हावळ, डॉ. पद्मराज मगदूम, डॉ. विनायक मलगुंडे, डॉ. योगेश शेळके, डॉ. राजकुमार माणगावे, डॉ. भूपाल पुजारी, डॉ. ऋतुराज हुपरे, डॉ. अरुण डुम, डॉ. नंदकुमार बनगे व डॉ. खोत हे या सेंटरसाठी विनामूल्य सेवा बजावत असल्याचे या वेळी संयोजकांनी प्रांताधिकारी डॉ. खरात यांना सांगितले.
कोविड सेंटरला प्रांताधिकारी व अप्पर तहसीलदार यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST