शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

अलमट्टी, सर्किट बेंचसंदर्भात गुरुवारी मुंबईत बैठक: मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 10:34 IST

मुख्यमंत्र्यांनी ‘अलमट्टी व सर्किट बेंच’ या विषयावर गुरुवारी (दि. १९) मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.

ठळक मुद्देअलमट्टी, सर्किट बेंचसंदर्भात गुरुवारी मुंबईत बैठक: मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासनसर्वपक्षीय नागरी कृती समिती, जिल्हा बार असोसिएशनने घेतली भेट

कोल्हापूर : पूरपरिस्थितीस अलमट्टी धरणाचा विसर्ग कारणीभूत असल्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय जल आयोगाच्या पाणीसाठ्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन सोमवारी रात्री सर्वपक्षीय नागरी कृती समितीने व मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘अलमट्टी व सर्किट बेंच’ या विषयावर गुरुवारी (दि. १९) मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.हॉटेल पंचशील येथे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महापौर माधवी गवंडी व निमंत्रक आर. के. पोवार व सहनिमंत्रक बाबा पार्टे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. यावेळी अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, बाबा जगताप, किशोर घाटगे, प्रकाश रोडे-पाटील आदींचा समावेश होता.सर्किट बेंचसंदर्भात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. जे. व्ही. पाटील, अ‍ॅड. गुरूप्रसाद माळकर, शिल्पा सुतार आदी उपस्थित होते.

विविध मान्यवरांनी  घेतली फडणवीस यांची भेट महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध मान्यवरांनी सोमवारी रात्री हॉटेल पंचशील येथे भेट घेतली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुुरुजी, साताराचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोेडे, विजय जाधव, राहुल देसाई, विजय आगरवाल, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राkolhapurकोल्हापूर