कोल्हापूर/ वारणानगर : विधान परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दोन्ही गटांकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रमुख नेत्यांकडून सहलीवर पाठविलेल्या मतदारांचा आढावा घेण्याचे काम मंगळवारी दिवसभर सुरू होते. शेवटच्या टप्प्यात गोळाबेरजेच्या राजकारणाने गती घेतली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार विनय कोरे व उमेदवार सतेज पाटील यांची वारणानगर येथे बैठक झाली.काँग्रेसमधील काही काठावर मतदारांनी सहलीवर जाण्यास टाळाटाळ केली होती; पण सोमवारी पक्षनिरीक्षकांनी तराटणी दिल्यानंतर ते सहलीच्या गाडीत बसले. मंगळवारी सात ते आठजणांना सहलीवर पाठविण्यात आले असून, आतापर्यंत सतेज पाटील यांच्याकडून २४२ जणांना सहलीवर पाठविल्याचे समजते. विरोधी गटाकडूनही शंभराहून अधिक सहलीवर पाठविल्याचा दावा केला आहे. सहलीवर किती मतदार गेले, त्यांच्याशी कोणाचा संपर्क होतो का? याविषयी आढावा या नेत्यांनी घेतला. त्यानंतर आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची अजिंक्यतारा येथे बैठक झाली. दरम्यान, वारणानगर येथे सतेज पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांनी जनसुराज्यचे संस्थापक विनय कोरे यांची भेट घेऊन बंद खोलीत एक तास चर्चा केली. यावेळी वारणा दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल विनय कोरे यांचे दोघांनीही शुभेच्छा देत अभिनंदन केले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते विजयसिंह जाधव, अशोकराव माने ग्रुपचे विजयसिंह माने, सचिन झंवर, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कारभारीच शिल्लकबहुतांशी मतदार दोन्ही गटांकडून सहलीवर पाठविण्यात आले आहेत. यामध्ये दोन्ही गटांचे ‘कारभारी’च कोल्हापुरात राहिले आहेत.
कोरे-आवाडे-सतेज पाटील यांची बैठक
By admin | Updated: December 23, 2015 01:23 IST