शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची पूजा करून विरोधकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:23 IST

महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात धरण्यात आलेल्या विकास निधीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत सत्तारूढ गटाने केलेल्या या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला.

ठळक मुद्देअंदाजपत्रकाची पूजा करून विरोधकांचा सभात्यागआगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध

कोल्हापूर : ‘महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात धरण्यात आलेल्या विकास निधीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत सत्तारूढ गटाने केलेल्या या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला.

सभात्याग करण्यापूर्वी त्यांनी अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची सभागृहातच पुष्पहार घालून तसेच हळद-कुंकू लावून पूजा करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी विकासकामांकरिता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या निधीचा विषय उपस्थित केला. त्यावर विरोधी सदस्यांनी सभेत गोंधळ घातला.

स्थायी समितीने ज्या कामांसाठी निधीची तरतूद केली होती, अशी अनेक कामे अंदाजपत्रकाच्या पुस्तकात दिसत नाहीत. मग हा निधी कोठे गेला, कोणत्या कामांकरिता धरण्यात आला, याची माहिती द्यावी, अशी मागणी कदम यांनी केली.सत्ता तुमची आहे म्हणून काहीही करता का? कोणाला विचारून हे बदल केले ? असे सवाल करीत अंदापत्रकातील फेरबदल आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा कदम यांनी सभेत दिला. आमच्या आघाडीच्या सदस्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार कदम यांनी यावेळी केली.

निषेध म्हणून विरोधी गटाच्या सदस्यांनी सभागृहातच अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची पूजा केली. यावेळी पुस्तकास पुष्पहार घातला, हळद-कुंकू वाहिले, नारळ अर्पण केला आणि हे पुस्तक आयुक्तांकडे सादर करीत आम्हांला तुमच्याकडून न्याय अपेक्षित असल्याचे कदम यांनी सांगितले.

सहायक आयुक्त संजय सरनाईक यांनी समाधानकारक उत्तर न देता, ‘महापालिकेचा निधी कोणत्या कामावर किती खर्च होणार आहे, याची सगळी माहिती पुस्तकात असल्याने वेगळी माहिती देण्याची आवश्यकता नाही,’ असे सांगताच सत्यजित कदम पुन्हा भडकले. आम्हाला अंदाजपत्रकातील काही कळत नाही. तुम्ही आम्हाला माहिती द्या, अशी त्यांनी सुूचना केली. तेव्हा सरनाईक यांनी ‘जेथे बदल झाले आहेत त्यांची माहिती तुम्हाला दिली जाईल,’ असे सांगितले. तरीही विरोधी गटाच्या सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर