शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

पी.एन., महाडिक, आवाडे प्रदेशाध्यक्षांना भेटणार

By admin | Updated: November 15, 2015 01:04 IST

विधानपरिषदेचे राजकारण : उद्या मुंबईला जाणार; सतेज पाटील यांचा पन्हाळा, शाहूवाडी दौरा

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री प्रकाश आवाडे हे उद्या, सोमवारी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या भेटीला मुंबईला रवाना होणार आहेत. प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे. सतेज पाटील यांनी शनिवारी पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विधानपरिषदेची कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाकडे आहे; पण काँग्रेसअंतर्गत कुरघोडीचे राजकारण पाहता ही निवडणूक काँग्रेसला तितकीशी सोपी जाणार नाही. काँग्रेसकडून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे. सतेज पाटील व आमदार महाडिक यांनी प्रचार सुरू केल्याने काँग्रेसअंतर्गत लढाई निश्चित आहे. उमेदवारीवरून झालेल्या पेचावर चर्चा करण्यासाठी पी. एन. पाटील, आमदार महाडिक, आवाडे हे उद्या, सोमवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेटीला जाणार आहेत. साधारणत: सकाळी साडेदहा वाजता हे नेते प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असून, त्यानंतर उमेदवारीच्या दिशा स्पष्ट होणार आहेत. चव्हाण यांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. आता काँग्रेसमध्ये महाडिक यांनी आम्हा तिघांपैकी कुणालाही उमेदवारी द्या, परंतु सतेज पाटील यांना नको, अशी भूमिका घेतली आहे. तर महापालिका निवडणूकीत पक्षाच्या विरोधात थेट ताराराणी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात आणल्याने व या आघाडीची भाजपबरोबर आता युती असल्याने महाडिक यांना उमेदवारी मागण्याचा हक्कच नसल्याचा दावा सतेज पाटील करत आहेत. त्यातूनच मग या दोघांनाही बाजूला करून तडजोडीचा उमेदवार म्हणून पी. एन. पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे, परंतु पी. एन. यांना ही उमेदवारी मिळाल्यास महाडिक रिंगणातून बाहेर जाणार की स्वरूप महाडिक यांना भाजप किंवा अपक्ष म्हणून रिंगणात आणणार यासंबंधीची संदिग्धता कायम आहे. पी. एन. यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास महाडिक थांबणार असतील तर मग निवडणूक बिनविरोध होणार की अन्य कांही राजकारण आकारास येणार याबध्दलही कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, शनिवारी सतेज पाटील यांनी पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील जिल्हा परिषदेचे सदस्य, सभापती व नगरपालिकांचे नगरसेवक यांची भेट घेतली. आमदार महादेवराव महाडिक यांनीही उर्वरित भागांचा दौरा करून नेत्यांसह मतदारांशी चर्चा केली. असेही काँग्रेसचे राजकारण.. महापालिका निवडणुकीत सतेज पाटील यांनी एकहाती यंत्रणा राबवून काँग्रेसला विजय मिळवून दिला. त्यांना काही प्रमाणात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची मदत झाली, परंतु महाडिक हे काँग्रेसच्या प्रचारात कुठेच नव्हते, तसेच प्रकाश आवाडेही या निवडणुकीकडे साधे फिरकलेही नव्हते. तरीही विधानपरिषदेच्या उमदेवारीचा विषय निघाल्यावर उमेदवारी मला द्या म्हणून हे दोघे सगळ््यात पुढे असे चित्र सध्या दिसत आहे. यालाच काँग्रेसचे ‘राजकारण’ म्हटले जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.