शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीवर आठ दिवसांत उपाययोजना करा : निलोफर आजरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:58 IST

कोल्हापूर : शहरातील वाहतूक कोंडीवर आठ दिवसांत उपाययोजना करा, असे आदेश महापौर निलोफर आजरेकर यांनी दिले. मंगळवारी शहरातील १७ ...

ठळक मुद्देवाहतूक कोंडीवर आठ दिवसांत उपाययोजना करा : निलोफर आजरेकर १७ ब्लॅक स्पॉटची पाहणी : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचे आदेश

कोल्हापूर : शहरातील वाहतूक कोंडीवर आठ दिवसांत उपाययोजना करा, असे आदेश महापौर निलोफर आजरेकर यांनी दिले. मंगळवारी शहरातील १७ ब्लॅक स्पॉटची त्यांनी पाहणी केली. वाहतूक संदर्भातील करण्यात येत असलेल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या  ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सीपीआर चौक, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, लिशा हॉटेल चौक याठिकाणी पाहणी करण्यात आली.शहरातील १७ ब्लॅक स्पॉट ठिकाणे निश्चित केली आहेत. येथे तात्पुरत्या व काही कायमस्वरूपी उपाययोजना सुचविलेल्या आहेत. तात्पुरत्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरू केली आहेत. संबंधित ठेकेदाराने सात महिने झाले तरी काम अपूर्ण ठेवल्यावरून महापौर आजरेकर यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करून घेण्याच्या सूचना दिल्या. चौकामध्ये हजार्ड मार्करची संख्या कमी असून ती वाढवण्यात यावी, व्हीनस कॉर्नर येथील राजाराम महाराज यांच्या पुतळ्याजवळील चौकातील पोल लहान टाकून बाजूला स्थलांतर करा. तसेच शहरातील सिग्नल व्यवस्था सुरळीत व सुस्थितीत ठेवा, असे आदेशही महापौर आजरेकर यांनी दिले. रिफ्लेक्टर कधी बसविणार असा जाब त्यांनी विचारला.शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सद्य:स्थितीत ३६ ट्रॅफिक साईन बोर्ड विविध ठिकाणी बसविले आहेत. तोरस्कर चौक, शिरोली प्रवेश कमानीच्या अलीकडे पुलावर रस्त्याच्या कडेला सुरक्षा गार्ड रेलिंग (लोखंडी) बसवले आहेत. तसेच ब्लॅक स्पॉट मधील चौकाचे ठिकाणी व अन्य चौकामध्ये एकूण १० हजार्ड मार्कर बसवल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे व्हीनस चौक व लिशा हॉटेल चौक येथील झेब्रा क्रॉसिंग पट्टे व स्टॉप लाईन पट्टे मारण्याचे काम पूर्ण केले.

उर्वरीत चौकांचे ठिकाणी थर्मोप्लास्टिक पट्टे मारण्याचे काम व त्यावर कॅट आईज बसविणेचे काम येत्या ८ दिवसांत पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, नगरसेवक राहुल चव्हाण, रियाज सुभेदार, अश्पाक आजरेकर उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMuncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर