शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टिका, स्पष्टच बोलले
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
5
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
6
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
7
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
8
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
9
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
10
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
11
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
13
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
14
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
15
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
16
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
17
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
18
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
19
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
20
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

महापौर सोमवारी राजीनामा देतील

By admin | Updated: February 7, 2015 01:04 IST

हसन मुश्रीफ : काँग्रेस नगरसेवकांना आश्वासन; बदनामीचा डाव असल्याचा आरोप

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी ठरल्याप्रमाणे सोमवारी (दि. ९) होणाऱ्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देतील, काळजी करू नका, असे आश्वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर काँग्रेस नगरसेवकांच्या शिष्टमंडळास दिले. महापौरांच्या लाचलुचपत प्रकरणामागे मोठे कारस्थान असून, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षङ्यंत्र असल्याचे सूचक विधान मुश्रीफ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. दरम्यान, महापौर माळवी यांनीही शुक्रवारी मुश्रीफ यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.लाचखोरीच्या संशयात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी गुरुवारी अटक व जामीन मंजूर झाल्यानंतर पदाचा तूर्त राजीनामा देणार नसल्याचे विधान केले. महापौर राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्यास त्यांना पदावरून कोणीही हटवू शकणार नाही. त्यामुळे महापौरपदाची संधी असलेल्या काँग्रेस नगरसेवकांत मोठी अवस्थता पसरली. महापौरांनी ठरल्याप्रमाणे सोमवारच्या सभेत राजीनामा द्यावा, या मागणीसाठी उपमहापौर मोहन गोंजारे, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक सचिन चव्हाण, परिवहन सभापती अजित पोवार, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, महिला बालकल्याण सभापती लीला धुमाळ आदी पदाधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. महापौर ठरल्याप्रमाणे राजीनामा देतील, अशी शाश्वती मुश्रीफ यांनी दिल्याने काँग्रेस नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, काँग्रेस पदाधिकारी येण्यापूर्वी महापौर माळवी यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन सविस्तर बाजू मांडली. लाचखोरीत गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय माळवी यांनी व्यक्त केला. न्यायालयावर पूर्ण विश्वास असून लवकरच ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ वस्तुस्थिती समोर येईल, असे महापौरांनी सांगितले. मुश्रीफ यांनी काळजी करू नका, पक्ष पूर्णपणे तुमच्या पाठीशी राहिल,असे सांगून या मागील ‘झारीतील शुक्राचार्य’ लवकरच समोर येतील, असे आश्वासन दिले.शिवसेनेचा सोमवारी मोर्चामहापौर तृप्ती माळवी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. ही कोल्हापूरच्या प्रतिमेस काळीमा फासणारी घटना आहे, असे असूनही महापौर माळवी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. महापौरांनी राजीनामा द्यावा व महापालिका बरखास्त करावी, या मागणीसाठी सोमवारी (दि.९) महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.माळवींची ‘लाचलुचपत’मध्ये हजेरीलाचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महापौर तृप्ती माळवी या शनिवार पेठ येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात हजेरी देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी हजर राहिल्या. सुमारे अर्धा तास माळवी या कार्यालयात होत्या. शुक्रवार (दि. ३०) जानेवारीला महापौर माळवी यांचा स्वीय साहाय्यक अश्विन गडकरी याला १६ हजार रुपयांची लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात माळवी यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना गुरुवारी (दि. ५) अटक केली. कोण हा गडकरीमहापौरांचा कोणीही अश्विन गडकरी नावाचा स्वीय साहाय्यक नव्हता. ‘कोण हा गडकरी’ उद्या माझे नाव सांगून कोणीही पैसे घेईल. अ‍ॅण्टी करप्शनमध्ये काही महापुरुष नाहीत. कोणा एका फाटक्या माणसाने केलेल्या आरोपावरून थेट महापौरांवर कारवाई करणे चुकीचे आहे. राज्यभर राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षङ्यंत्र असून महापौरांची बदनामी हा त्याचाच भाग असल्याचा संशय हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.