शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर चषक फुटबॉल स्पर्धा ; ‘खंडोबा’ला नमवून फुलेवाडी उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:18 IST

चुरशीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ चा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सजग गोलरक्षणामुळे फुलेवाडीच्या जिगर राठोडला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

ठळक मुद्देमहापौर चषक फुटबॉल स्पर्धा ; ‘खंडोबा’ला नमवून फुलेवाडी उपांत्य फेरीतजिगर राठोडचे उत्कृष्ट गोलरक्षण

कोल्हापूर : चुरशीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ चा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सजग गोलरक्षणामुळे फुलेवाडीच्या जिगर राठोडला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत फुलेवाडी व खंडोबा तालीम मंडळ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी चेंडू एकमेकांच्या गोलक्षेत्रात फिरता ठेवला.

खंडोबाकडून कपिल शिंदे, माणिक पाटील, अजिज मोमीन, प्रभु पोवार, विकास बहारे यांनी तर फुलेवाडीकडून अभिषेक देसाई, निलेश खापरे, संकेत वेसणेकर, रिचर्ड, रोहीत मंडलिक, अरबाज पेंढारी यांनी लक्षवेधी खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही संघांच्या दमदार खेळीमुळे सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला.उत्तरार्धात खंडोबा संघाने आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन करण्यास सुरूवात केली. त्याचाच फायदा ५५ व्या मिनिटाला कपिल शिंदेने उठवित गोल केला. त्यामुळे खंडोबा संघास १-० अशी आघाडी मिळाली. या आघाडीनंतर फुलेवाडी संघाकडून वेगवान व शॉर्ट पासिंगचा अवलंब करण्यात आला. या दरम्यान खंडोबा संघाचा मोठ्या गोलक्षेत्राबाहेर मिळालेल्या फ्री कीकवर डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या गोलची नोंद फुलेवाडीच्या रिचर्डने केला.

हा गोलचा फटका इतका वेगवान होता की गोलरक्षकाला हा चेंडू गोलजाळ्यात कधी शिरला हे कळालेच नाही. त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत आला. अखेरीस सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. त्यात फुलेवाडीकडून अरबाज पेंढारी, रिचर्ड, रोहित मंडलिक यांनी, तर खंडोबाकडून केवळ निखिल जाधव यास गोल करण्यात यश आले. त्यामुळे हा सामना फुलेवाडी संघाने ३-१ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर