शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महापौरांनी केली प्राथमिक शाळांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 21:42 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्रुटी व उणिवा दूर करून शाळांना द्याव्या लागणाºया सोई-सुविधाच्या अनुषंगाने मंगळवारी महापौर हसिना फरास, प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे यांनी पदाधिकारी, अधिकाºयांसह शाळांची पाहणी केली.

ठळक मुद्देमुलांच्या शिक्षणाचा दर्जा कशा प्रकारे वाढविता येईल, यासाठी महापौर व पदाधिकारी यांनी शाळांची पाहणी करण्याचे नियोजन शाळेमध्ये लागणाºया सुविधा व इतर आवश्यक कामांची यादी देण्याबाबत

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी त्रुटी व उणिवा दूर करून शाळांना द्याव्या लागणाºया सोई-सुविधाच्या अनुषंगाने मंगळवारी महापौर हसिना फरास, प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे यांनी पदाधिकारी, अधिकाºयांसह शाळांची पाहणी केली.

महापालिकेच्या शाळांमध्ये ज्या त्रुटी असतील, त्यांचा अभ्यास करून महापालिका व शासन निधीतून आणि पी.पी.पी. तत्त्वावर शाळा विकसित करण्यात येणार आहेत. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा कशा प्रकारे वाढविता येईल, यासाठी महापौर व पदाधिकारी यांनी शाळांची पाहणी करण्याचे नियोजन केले होते.

या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून महापालिकेच्या शाळांची पाहणी करण्याची सुरुवात करण्यात आली.यामध्ये मंगळवारी संत रोहिदास विद्यामंदिर, सुभाषनगर; वीर कक्कया विद्यालय, जवाहरनगर; शाबाजखान अमीनखान जमादार उर्दू मराठी स्कूल, वि. स. खांडेकर विद्यामंदिर, प्रतिभानगर या शाळांची पाहणी केली. पाहणीमध्ये शिक्षणपद्धती, ई-लर्निंग सुविधा, मूलभूत सोई-सुविधा, पोषण आहार, इमारतीची दुरवस्था, आदींची पाहणी केली. यावेळी महापौरांनी शाळेमध्ये लागणाºया सुविधा व इतर आवश्यक कामांची यादी देण्याबाबत संबंधित मुख्याध्यापक व अधिकाºयांना सूचना दिल्या. तसेच शाळा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी एक महिन्याच्या आत सर्व शाळांचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, वीर कक्कया विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी सुफिया गौसमहंमद पटेल हिचे मेंदूज्वराने निधन झाल्याने महापौर हसिना फरास व पदाधिकाºयांनी तिच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुफिया वीर कक्कया शाळेची हुशार व गुणी विद्यार्थिनी होती. पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये तिचा जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक आला होता. तिच्यावर आधार हॉस्पिटलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून उपचार चालू होते.

यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वहिदा सौदागर, उपसभापती प्रतीक्षा पाटील, छाया पोवार, सभागृह नेता प्रवीण केसरकर, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका सविता घोरपडे, सतीश घोरपडे, प्राथमिक शिक्षण समितीचे लेखापाल राजीव साळोखे, प्रोजेक्ट आॅफिसर रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील, शांताराम सुतार, आदी उपस्थित होते.