शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

माउलींची पालखी यंदा सोशल मीडियावर ‘लाईव्ह’

By admin | Updated: June 29, 2016 00:53 IST

‘चला वारीला’ टीमचा उपक्रम : प्रत्येक क्षणाचे मिळणार अपडेटस्

संतोष तोडकर-- कोल्हापूर --माउलींच्या सहवासाची आणि विठुरायाच्या भक्तीची आस बाळगून राज्यभरातून लाखो वैष्णवजन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये दरवर्षी दाखल होतात; परंतु ज्यांना या सोहळ्यात सहभागी होता येत नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील तरुणांनी एकत्र येऊन ‘चला वारीला’ हे फेसबुक पेज सुरू केले आहे. याद्वारे प्रत्येक क्षणाचे अपडेट्स भाविकांना घरबसल्या मिळणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या १८६ व्या आषाढी पायी वारी सोहळ्यास मंगळवारपासून आळंदी येथून सुरुवात झाली. ही वारी १४ जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे. सोशल मीडियाच्या वारीत फोटोग्राफी व व्हिडीओ शुटिंगसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, पालखी सोहळ्यातील प्रत्येक क्षणाचे अपडेट्स लगेच पेजवर अपलोड केले जाणार आहेत. तसेच दिंडी परंपरा, वारकरी संप्रदाय, वारीतील अनेक प्रसंग, प्रस्थान, रिंगण धावा आणि परंपरा यांची माहिती, व्हिडिओ क्लिप्स व छायाचित्रे यांचा वापर करून दिली जाणार आहे. ही संकल्पना अविनाश सूर्यवंशी व सागर गंधारी यांची आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील तरुण एकत्र आले आहेत. यामध्ये श्रीकांत भेंडे, आशिष तोमर, गौरीश सोनार, श्रीराम बडवे, संतोष देशपांडे, प्रकाशराजे कुंभार, अवी दास, सागर घोटेकर, विनायक वेंगपल्ली, अभिषेक कुंभार, महेश ढाकणे, धनंजय कोकाटे, शिवराज माने, विनायक चिखलगे, आदींचा समावेश आहे.असा घ्या अनुभव :वारी अनुभवण्यासाठी फेसबुकच्या ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ूँं’ं६ं१्र’ं या लिंकवर जाऊन पेज ‘लाईक’ केल्यास माउलींच्या पालखी सोहळ्याचा प्रत्येक क्षण आपल्या टाईमलाईनवर आपोआप अपडेट होत राहील.वारी ही देशातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जात, पात, धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन तिचे महत्त्व आहे. डिजिटल युगामध्ये घरबसल्या दर्शन घेता यावे व एकतेचा सोहळा पाहता यावा या हेतूने ‘चला वारीला’ या पेजची निर्मिती केल आहे. - अविनाश सूर्यवंशी, संकल्पक, चला वारीला.