शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

कोरे-सरुडकर यांच्यातच रंगणार सामना

By admin | Updated: June 16, 2014 00:40 IST

राजू शेट्टी यांची भूमिका निर्णायक : भारत पाटील, अमर पाटील यांची उमेदवारी कोरे यांना अडचणीची

राजाराम कांबळे ल्ल मलकापूरशाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी डझनभर इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र, विद्यमान आमदार विनय कोरे व माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यातच मुख्य लढत रंगणार आहे. खासदार राजू शेट्टी यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील व काँग्रेसचे अमर पाटील यांची उमेदवारी विनय कोरे यांची डोकेदुखी वाढविणारी आहे.‘राष्ट्रवादी’चे कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, ‘काँग्रेस’चे कर्णसिंह गायकवाड हे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की, अन्य कोणाला पाठिंबा देणार यावर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुनर्रचनेनंतर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शाहूवाडी तालुका आणि पन्हाळ्यातील दहा जिल्हा परिषद गटात मतदारसंघाची बांधणी उमेदवाराला करावी लागते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांना १ लाख ६ हजार १९३ मते मिळाली, काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना ६३ हजार २१३ मते मिळाली. राजू शेट्टी यांना ४२ हजार ९८० मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा निवडणुकीत दबदबा राहणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फारसे समाधानकारक नाही. मोदी लाटेत शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना दिलेला पाठिंबा जनतेला मान्य झाला नाही. त्यामुळे मातब्बर दोन्ही गायकवाड गट, सरुडकर गट व जनसुराज्य पक्षाचा धुव्वा उडाला. त्यामुळे आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील यांना विधानसभा निवडणूक सोपी नसल्याचा जनतेने इशारा दिला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड गटाची युती झाली. या आघाडीने चार जिल्हा परिषद व सात पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणले, तर आमदार विनय कोरे व राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या युतीने पंचायत समितीची एक जागा व मलकापूर नगर परिषदेवर सत्ता स्थापन केली. या साडेचार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळेल.मानसिंगराव गायकवाड यांनी सरुडकर गटाशी साधलेली जवळीक, तर कर्णसिंह गायकवाड गटाचे जनसुराज्यशी वाढलेले संबंध, शिवसेनेत असलेला अंतर्गत कलह, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाढत असलेले महत्त्व या सर्व बाबींचा विचार करता आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. पन्हाळ्यातून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारत पाटील आणि अमर पाटील यांनी केलेली विधानसभेची तयारी आमदार विनय कोरे यांना अडचणीची ठरणार आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सेनेची उमेदवारी घेणार, अशी केलेली जाहीर भूमिका तर सेनेतील उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर व निष्ठावंत शिवसैनिकांनी या उमेदवारीला विरोध जाहीर केला आहे. त्यामुळे सत्यजित पाटील यांना देखील ही निवडणूक सोपी नाही. युवासेना उपाध्यक्ष युवराज काटकर, ‘दलित महासंघा’चे कार्याध्यक्ष रमेश चांदणे ‘भाजप’चे राजू प्रभावळकर, ‘शेतकरी संघटने’चे माजी सरपंच संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य योगिराज गायकवाड, कर्णासिंह गायकवाड, मानसिंगराव गायकवाड या उमेदवारांनी आगामी विधानसभेची चाचपणी सुरू आहे.आज घडीला विधानसभा निवडणुकीचे चित्र अस्पष्ट असले, तरी आमदार विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील अशी लढत होणार आहे. या दोन्ही गटांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.