शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील सात उमेदवारांना 'मॅट'चा दिलासा; निवड रद्दचा आदेश ठरवला चुकीचा

By उद्धव गोडसे | Updated: May 19, 2024 17:45 IST

जाहिरात प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्न.

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत घेतलेल्या परीक्षेतून आणि छाननी प्रक्रियेतून स्टाफ नर्स पदासाठी निवड झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सदोष ठरवून विभागाने सात उमेदवारांची निवड रद्द केली होती. यावर संबंधित उमेदवारांनी महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच मॅटमध्ये दाद मागितली असता, मॅटने आरोग्य विभागाच्या जाहिरात प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून सात उमेदवारांची निवड रद्द करण्याचा निर्णय अयोग्य ठरवला. यामुळे सात उमेदवारांना दिलासा मिळाला.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ऑगस्ट २०२३ मध्ये स्टाफ नर्स पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीनुसार प्रीती चौहान (रा. कणेरीवाडी, ता. करवीर), शुभदा कांबळे (रा. बालिंगा, ता. करवीर), धनश्री पोवार (रा. सुभाषनगर, कोल्हापूर), सायली मिसाळ (रा. वडणगे, ता. करवीर), निशात अत्तार (रा. सांगली), अरुणा दांडेगावकर (रा. नांदेड) आणि कांचन खाडे (रा. ठाणे) यांनी अर्ज भरला होता. परीक्षेनंतर आरोग्य विभागाच्या कोल्हापूर परिमंडळाने कागदपत्रांची छाननी करून अर्जदारांनी निवड केली. त्यांना नियुक्तीपत्रही दिले. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बदल केल्याचे कारण देत सात उमेदवारांची निवड रद्द केली. याबाबत संबंधित उमेदवारांनी ॲड. योगेश जोशी (कुडीत्रेकर) यांच्यामार्फत मुंबईत मॅटमध्ये दाद मागितली. मॅटच्या अध्यक्षांनी आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया तपासून आणि ॲड. जोशी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सात उमेदवारांची निवड रद्द करण्याचा निर्णय अयोग्य ठरवला. विशेष म्हणजे अवघ्या आठवड्यात हा निकाल लागला.

दोन जाहिरातींमुळे गोंधळसार्वजनिक आरोग्य विभागाने सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत शासकीय शैक्षणिक संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी कोटा पद्धतीचा उल्लेख केला नव्हता. त्यानंतर आठवड्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत शुद्धीपत्रकाचा उल्लेख न करताच कोटा पद्धतीचा अवलंब केला. मात्र, त्यापूर्वीच भरलेल्या अर्जांसंदर्भात काहीच निर्णय घेतला नाही. कोटा पद्धत लागू केल्याचे उमेदवारांना कळवलेही नाही. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती उमेदवारांनी दिली.

जाहिरातीसंदर्भात शुद्धीपत्रक न काढणे आणि कोटा पद्धती उमेदवारांना न कळवणे ही आरोग्य विभागाची गंभीर चूक होती. त्याचा फटका उमेदवारांना बसून त्यांचे करिअर धोक्यात आले होते. यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला. - ॲड. योगेश जोशी (कुडीत्रेकर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर