शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

युवकांत शहिदांचा आदर्श कौतुकास्पद : क्रांतिकारकांचे वंशज कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:55 IST

शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी देशासाठी दिलेले बलिदान फार मोठे आहे. याच शहिदांचा आदर्श घेऊन आजची पिढी देशप्रेम आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे,

ठळक मुद्देहलगीच्या कडकडाटात रुईकर कॉलनीतून मिरवणूक

कोल्हापूर : शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी देशासाठी दिलेले बलिदान फार मोठे आहे. याच शहिदांचा आदर्श घेऊन आजची पिढी देशप्रेम आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे, हे कौतुकास्पद आहे. कोल्हापुरातील अनोखे स्वागत पाहून भारावून गेलो आहे, अशा भावना अभय सिंग, आनुज थापर आणि सत्यशील राजगुरू यांनी व्यक्त केल्या.

कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, साथी फाउंडेशन, वुई कॅन फाउंडेशन व मराठा रणरागिणींतर्फे शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शहीद भगतसिंग यांचे पुतणे अभय सिंग, सुखदेव यांचे नातू आनुज थापर आणि राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरू हे सोमवारी कोल्हापुरात आले. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रुईकर कॉलनी येथे कोल्हापुरी फेटा बांधून मिरवणुकीस प्रारंभ झाला. हलगीच्या कडकडाटामध्ये मिरवणूक ताराराणी पुतळा येथे आली. या ठिकाणी ‘भारत माता की... जय, वंदे मातरम्, इन्कलाब जिंदाबाद, शिवाजी महाराज की... जय’, असा जयघोष करत ताराराणी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आनुज थापर म्हणाले, देशप्रेमाचे विचार आज दृढ होणे गरजेचे आहे. शहीद जवानांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.सत्यशील राजगुरू म्हणाले, तरुण पिढीचे देशाप्रती असलेले कर्तृत्व प्रत्येक नागरिकांनी ओळखले पाहिजे. सामाजिक कार्यात युवकांनी अग्रेसर राहणे गरजेचे आहे.

अभय सिंग म्हणाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपण देशसेवेसाठी नेहमी अगे्रसर राहिले पाहिजे. यावेळी सरोज पाटील, भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, संयोजन समितीचे जितेंद्र बामणे, निखिल शिंदे, विनय गुरव, पंकज आणेकर, सुनील रेडेकर, पृृथ्वीराज महाडिक, मनीषा जाधव, संजीवनी देसाई, सीमा पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज व्याख्यान‘क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांशी संवाद’ हा कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात आज, मंगळवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे. त्यानिमित्ताने क्रांतिकारकांचे हे वंशज पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमात शहिदांवरील चित्रफीत दाखविण्यात येईल. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. क्रांतिकारकांचे वंशज प्रमुख उपस्थित राहणार आहेत.