शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार, व्यवसाय बंद ठेऊन शहीद जवानांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:28 IST

कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, गुजरी, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, आदी परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन, सोमवारी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे गुजरी परिसरात सकाळी निषेध फेरी काढण्यात आली.

ठळक मुद्देव्यापार, व्यवसाय बंद ठेऊन शहीद जवानांना आदरांजलीगुजरी परिसरात निषेध फेरी; ठिकठिकाणी फलक

कोल्हापूर : शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, गुजरी, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, आदी परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन, सोमवारी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे गुजरी परिसरात सकाळी निषेध फेरी काढण्यात आली.पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने देशभरातील व्यापारी, व्यावसायिकांना सोमवारी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली.

गुजरी परिसरातील सराफ व्यावसायिकांनी दुकाने, पेढी बंद ठेवल्या. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे सकाळी नऊ वाजता गुजरी मेनरोड, महाद्वार रोड, भेंडे गल्ली, कासार गल्ली, भाऊसिंगजी रोड, आझाद गल्ली मार्गावर निषेध फेरी काढण्यात आल्या. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान को जला दो’, अशा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

या फेरीमध्ये सराफ संघाचे उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, विजय हावळ, किरण गांधी, जितेंद्र राठोड, महेंद्र ओसवाल, बाळू पाटील, प्रकाश ओसवाल, नीलेश ओसवाल, जवाहर गांधी, संजय ओसवाल, आदी सहभागी झाले. महाद्वार रोड, जोतिबा रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, लुगडी ओळ, बिंदू चौक, शिवाजी रोड, हत्तीमहल रोड, गंगावेश, शाहूपुरी, राजारामपुरी परिसरातील दुकाने बंद होती.

बहुतांश फेरीवाल्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला; त्यामुळे नेहमी गजबजलेल्या या परिसरात शुकशुकाट पसरला होता. लक्ष्मीपुरी परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. काही मेडिकल दुकाने, हॉटेल सुरू होती. शहरातील विविध व्यापारीपेठांमध्ये शहीद जवानांना अभिवादन करणारे, आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहेत.

तीन लाखांची मदत जमाया शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने पाच लाखांचा निधी जमा करण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत तीन लाखांचा निधी जमा झाला आहे. बंद पाळून आम्ही शहीद जवानांना आदरांजली वाहिली असल्याचे उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले. 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूर