शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

न्यायाधीशांसमोर विवाहितेचा स्वत:च्या गळ्याला चाकू

By admin | Updated: January 31, 2017 23:50 IST

सांगलीतील घटना; न्यायव्यवस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप

सांगली : पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेल्या मंगरुळ-चिंचणी (ता. खानापूर) येथील स्वाती महेश शिंदे (वय २६) या विवाहितेने चक्क न्यायाधीशांसमोरच स्वत:च्या गळ्याला चाकू लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. न्यायाधीश, कर्मचारी व पोलिसांनी वेळीच धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला. सांगलीत पाचवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही घटना घडली. न्यायालयात स्वाती शिंदे हिने पर्समधील चाकू काढून स्वत:च्या गळ्याला लावला व न्यायाधीशांना आत्महत्येची धमकी दिली. ‘तुम्ही भ्रष्ट आहात, तुमच्यावर व तुमच्या न्यायप्रक्रियेवर माझा विश्वास नाही’, असा आरोपही तिने केला. न्यायालयाने तिला तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न, न्यायालयाच्या कामात व्यत्यय व न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयात बंदोबस्तात असलेल्या महिला पोलिस शिपाई सुप्रिया शेडबाळे यांनी फिर्याद दिली आहे. संशयित स्वाती शिंदे हिला रात्रीच अटक करून काही तासानंतर जामिनावर सोडण्यात आले.साळशिंगे (ता. खानापूर) येथील दुर्योधन जाधव यांची मुलगी स्वाती हिचा डिसेंबर २०१४ मध्ये मंगरुळ (चिंचणी)मधील महेश शिंदे यांच्याशी विवाह झाला आहे. तिचा पती महेश आॅस्ट्रेलिया येथे खासगी कंपनीत नोकरी करतो. विवाहानंतर दीड-दोन महिने स्वाती सासरी होती. त्यानंतर कौटुंबिक कारणावरुन मतभेद निर्माण झाल्याने ती माहेरी निघून गेली. नातेवाईकांनी मध्यस्थी करून मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पण स्वातीने सासरी जाण्यास नकार दिला. आॅगस्ट २०१६ मध्ये तिने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी सांगलीतील पाचवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दोन-तीन वेळा सुनावणी झाली. न्यायालयाने महेश व स्वाती या दाम्पत्यास समझोता करण्यास वेळ दिला होता. तरीही त्यांच्यातील भांडण न मिटल्याने समझोता झालाच नाही. स्वातीने सासरी जाण्यास न्यायालयाला स्पष्टपणे नकार देऊन घटस्फोटाचा निर्णय देण्याची मागणी केली होती. सोमवारी (दि. ३० जानेवारी) घटस्फोटाच्या अर्जावर अंतिम सुनावणी होती. त्यामुळे स्वाती व महेश यांचे नातेवाईक सकाळपासून न्यायालयाच्या आवारात बसून होते. दुपारी प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात झाली. न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज निकाली काढलयानंतर महेश व स्वातीचे नातेवाईक न्यायालयातून बाहेर पडले. महेशचे नातेवाईक मंगरुळला (चिंचणी) जाण्यासाठी तेथून निघालेही होते. त्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता स्वाती अचानक पुन्हा न्यायालयात गेली. न्यायालयात दुसऱ्या खटल्याचे कामकाज सुरू होते. स्वातीने न्यायालयास ‘मी पतीसोबत नांदायला तयार आहे’, असे सांगितले. यावर न्यायालयाने शिपायास तिच्या पतीला बोलावून आणण्यास सांगितले, पण पती व त्याचे घरचे निघून गेले होते. त्यामुळे स्वातीने अचानक पर्समधील चाकू काढून स्वत:च्या गळ्याला लावला. ‘तुम्ही भ्रष्ट आहात, तुमच्यावर व तुमच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास नाही’, असा आरोप करून आत्महत्येची धमकी दिली. या प्रकारामुळे न्यायालयात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)पोलिस, कर्मचाऱ्यांची धावपळस्वातीने पर्समधील चाकू काढून चक्क न्यायाधीशांसमोर स्वत:च्या गळ्याला लावून आत्महत्येची धमकी दिल्याने न्यायालयातील कर्मचारी, शिपाई व पोलिसांची तारांबळ उडाली. तिला बोलण्यात गुंतवून महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तिच्याकडील चाकू काढून घेतला. तिला ताब्यात घेण्यात आले. तिला शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे जामीनपात्र आहेत. तिला जामिनावर सोडण्याचा अधिकार पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच तिला जामिनावर सोडले.