शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

लग्न ठरेना, खर्च भागेना-सीएचबीधारकांची व्यथा-वर्षभर राबून तुटपुंजे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:07 IST

कोल्हापूर : सेट-नेट, एम.फिल., पीएच.डी.च्या अभ्यास, संशोधनासाठी किमान दहा वर्षे खर्च करूनही प्राध्यापक होण्याचे ध्येय बाळगलेल्या अनेकांवर वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देइतर वेळेत पडेल ते काम करण्यास तयार

संतोष मिठारी ।कोल्हापूर : सेट-नेट, एम.फिल., पीएच.डी.च्या अभ्यास, संशोधनासाठी किमान दहा वर्षे खर्च करूनही प्राध्यापक होण्याचे ध्येय बाळगलेल्या अनेकांवर वेठबिगारी करण्याची वेळ आली आहे. घरखर्च भागविण्यासाठी अनेक ‘सी.एच.बी.’धारकांना हॉटेलमधील वेटर, कॅप्टन, मॅनेजर, रस्त्यांवर पुस्तके विकणे, गॅस सिलिंडरचे वितरण करणे अशा पर्यायी कामांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे अनेकांचे विवाह ठरेनासे झाले आहेत.

एम.ए., एम.एस्सी., एम.कॉम., आदी अभ्यासक्रमांतील उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून राज्य पात्रता परीक्षा (सेट), राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) यांचा अभ्यास सुरू केला जातो. अभ्यासामध्ये सातत्य असल्यास या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन ते पाच वर्षे लागतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अधिकची शैक्षणिक पात्रता असावी म्हणून पुन्हा तीन वर्षांचा एम.फिल. अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि नंतर पीएच. डी.ला प्रवेश घेऊन पुन्हा चार ते पाच वर्षे संशोधनाचे काम या विद्यार्थ्यांकडून केले जाते. या उच्च शिक्षणासाठी अनेक युवक-युवतींच्या आयुष्यातील आठ-दहा वर्षे खर्च होतात.

इतकी वर्षे खर्च करूनही या उच्च शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही. त्यांना मिळते ती ‘सी.एच.बी.’सारखी वेठबिगारी. यासाठीही युवक-युवतींना संस्थाचालकांची पायधरणी करावी लागते. यानंतर कदाचित ‘सी.एच.बी.’साठी निवड झालीच, तर कायमस्वरूपी प्राध्यापकांकडून सी.एच.बी.धारकांना आपले सेवक म्हणूनच राबविले जाते. त्यांनी सांगितलेल्या सर्व आदेशांचे पालन करणे, महाविद्यालयीन पूर्णवेळ काम करणे, विभागांच्या फायलींचे रेकॉर्ड ठेवणे, नॅक मूल्यांकनाच्या फायली बनविणे अशी अनेक कामे त्यांना करावी लागतात. ‘सी.एच.बी.’धारकांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. त्यामुळे अनेक ‘सी.एच.बी.’धारक युवकांची लग्न ठरत नसल्याचे वास्तव आहे. ज्यांचे लग्न झालेले आहे, त्यांना घरखर्च भागविताना कसरत करावी लागत आहे.

यात मग, अनेकांना पार्टटाइम काम करावे लागत आहे. महाविद्यालयातील सी.एच.बी.चे काम झाल्यानंतर कुणी हॉटेलमध्ये कॅप्टन, मॅनेजर म्हणून, कुणी गॅस सिलिंडरचे वितरण करणे, तर कुणी रस्त्यावर बुक स्टॉल थाटला आहे. काहीजण शेतात राबतात, तर काहीजण दोन-दोन महाविद्यालयांत सीएचबी म्हणून काम करीत आहेत.वर्षभरात अवघे ४० हजारइतके करूनदेखील सी.एच.बी.धारकांना मानधन म्हणून वर्षभरात ४० ते ५० हजार रुपये मिळतात. वयाची ३५-४० वर्षे पूर्ण केलेले अनेकजण अजूनही सी.एच.बी.धारक म्हणूनच राबत आहेत. या आर्थिक शोषणाविषयी सरकार डोळेझाकपणा करीत आहे. सी.एच.बी.धारकांना कोणीच वाली नसल्याने त्यांचे शोषण सुरू आहे. 

वेतन आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी शासनाने निधी नाही म्हणणे हे चुकीचे आहे. एकीकडे सहायक प्राध्यापक भरतीसाठी निधी नाही म्हणायचे आणि दुसरीकडे सातवा वेतन आयोग जाहीर करावयाचा, ही शासनाची भूमिका योग्य नाही. शिक्षणमंत्री वारंवार सांगतात की, उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील आहे; पण त्यांच्या हे कसे लक्षात येत नाही की गुणवत्ता वाढीसाठी सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरणे गरजेचेच आहे.- डॉ. दिनकर कांबळे, कोनोली (राधानगरी, जि. कोल्हापूर)नेट-सेट, एम.फिल., पीएच.डी. करून सी.एच.बी.धारक म्हणून काम करणाºया अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सी.एच.बी.धारकांना तुटपुंजे मानधन मिळते. तेदेखील वेळेवर मिळत नाही. केंद्र व राज्य शासनाने या समस्याकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर पूर्णवेळ सहायक प्राध्यापक पदांची भरती करावी.- मनीषा नायकवडी, कोल्हापूर.