शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंदी आदेश झुगारून लक्ष्मीपुरीत भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:24 IST

कितीही नियम केले तरी आम्ही मोडणारच, अशीच मानसिकता बनलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईत नियम मोडण्याचा सिलसिला रविवारीही कायम राहिला. बाजार बंद राहील असे आदेश काढूनही व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवत रस्त्यावरच बाजार मांडला. त्यामुळे नेहमीसारखी बाजारात रस्त्यावर गर्दी उसळली.

ठळक मुद्देबंदी आदेश झुगारून लक्ष्मीपुरीत भरला बाजारआयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली : रस्त्यांवर उसळली गर्दी

कोल्हापूर : कितीही नियम केले तरी आम्ही मोडणारच, अशीच मानसिकता बनलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईत नियम मोडण्याचा सिलसिला रविवारीही कायम राहिला. बाजार बंद राहील असे आदेश काढूनही व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवत रस्त्यावरच बाजार मांडला. त्यामुळे नेहमीसारखी बाजारात रस्त्यावर गर्दी उसळली.लक्ष्मीपुरी परिसर अतिजोखीमग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर बाजार भरवू नये अशी भूमिका महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतली होती. प्रशासनाने व्यापाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याचाही प्रयत्न केला; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गर्दी वाढतच राहिली.

त्यामुळे शुक्रवारी आयुक्तांनी बंदी आदेश काढून आठवडा बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर केले; पण प्रत्यक्षात रविवारी सकाळी तासभरच बाजार बंद राहिला. कारवाईला कोण येत नाही, म्हटल्यावर सर्वच व्यापाऱ्यांनी टेम्पोसह धाव घेतली. टेम्पोत बसूनच त्यांनी भाजी विक्री सुरू केली. फळविक्रीच्या गाड्या आधीपासून सुरूच होत्या. त्यात भाजीवालेही बसल्याने एकूणच रस्त्यांवर प्रचंड विस्कळीतपणा आला. मिळेत त्या जागेवर विक्री सुरू झाली. बाजार सुरू झाला आहे म्हटल्यावर ग्राहकांचीही गर्दी वाढू लागली. एकच्या सुमारास तर गर्दीने रस्ते ओसंडून वाहू लागले.बंदी आदेश असतानाही भाजीपाला विक्री करताना व्यापाऱ्यांनाही धास्ती होतीच. विक्री सुरू असतानाच पोलिसांची गाडी येताना दिसल्यावर व्यापाऱ्यांनी ह्यगाडी आली, पळा पळाह्णह्ण अशी आरडाओरड सुरू केली. व्यापाऱ्यांची आवराआवर सुरू झाली; पण प्रत्यक्षात गाडी समोर आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल, पर्स सांभाळा असे पुकारल्यानंतर तणावाची जागा हास्याने घेतली आणि त्यांनी बिनदिक्कतपणे विक्री सुरू केली.कोथिंबीर १० रुपये पेंढीमागील दोन-तीन महिने ऐट मिरवणारी कोथिंबीर आता मात्र कचरा झाली आहे. ५० रुपयांनी विकल्या गेलेल्या कोथिंबिरीचा दर १० रुपये झाला तरी गिऱ्हाईक नाही. बाजारात कोथिंबीरीचे ढीगच लागले आहेत. टेम्पोत बसून ओरडून ओरडून विकावे लागत आहे.भाजीपाला मुबलक, दर ४० ते ५० रुपये किलोबाजारात भाजीपाल्याची आवक मुबलक झाली आहे. वांगी, दोडका, गवारी, ढबू मिरची, कोबी, दुधीचे दर ४० ते ५० रुपये किलो असेच आहेत. फ्लॉवरची आवक जास्त दिसत असून एक गड्डा १० ते २० रुपयांना आहे. टोमॅटोही १५ ते २० रुपये किलो असा दर आहे. मेथीची आवक वाढत असून दरही आवाक्यात आले आहेत. १० ते १५ रुपये असा पेंढीचा दर आहे. लिंबूंची आवक वाढली असून पिवळेधमक लिंबू १० रुपयांना १० असे विकले जात आहेत.

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर