शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Christmas-सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, आदींनी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 11:30 IST

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या महत्त्वाच्या सणाची लगबग शहरात सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चमध्ये या सणाची तयारी सुरू असून, चर्च विद्युत रोषणाईने झगमगले आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देसांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, आदींनी सजली बाजारपेठनागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह

कोल्हापूर : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ अर्थात ख्रिसमस या ख्रिस्ती बांधवांच्या महत्त्वाच्या सणाची लगबग शहरात सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चमध्ये या सणाची तयारी सुरू असून, चर्च विद्युत रोषणाईने झगमगले आहेत.नाताळ हा आनंद व हर्षोल्हासाचा सण आहे. ‘ख्रिसमस’चा शब्दश: अर्थ आहे ‘क्राइस्ट्स मास’ अर्थात प्रभू येशूचा जन्मदिवस होय. हा सण बुधवारी (दि. २५) साजरा होत आहे. जरी हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी सर्वधर्मीय नागरिकही आपलाच सण म्हणून तो साजरा करतात.

या सणाच्या निमित्ताने खास ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे कपडे, बक्षिसांची पोटली तर लहानांची नव्हे तर थोरामोठ्यांचेही आकर्षण असते. अजूनही पालक लहान मुलांच्या उशाला त्यांचे आवडते गिफ्ट ठेवतात आणि सांताक्लॉजच्या आठवणीत लहान मुले रंगून जातात.नाताळ आता चार दिवसांवर आल्याने ख्रिस्ती बांधवांच्या घराघरांत सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध चर्चनाही रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सणासाठी बाजारपेठही फुलली आहे.

शहरातील पापाची तिकटी पाईपलाईन, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक या महत्त्वाच्या बाजारपेठेत लहान-मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल्स, चांदण्या, सांताक्लॉजचे शर्ट, सांताक्लॉजची टोपी, कपडे, चॉकलेट, कॅडबरी, सजावटीचे बॉल्स, रंगबेरंगी मेणबत्त्या, विशिष्ट आकाराच्या जिंगल बेल्ससह विविध वस्तूंना मोठी मागणी आहे.

नाताळमध्ये डोनेट आणि केकला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे विविध आकारांसह विविध स्वादांतील साधे, पेस्ट्री, चीज, आदी प्रकारच्या केकनी बेकऱ्याही सजल्या आहेत. असे साहित्य केवळ ख्रिस्ती बांधव खरेदी करीत नाहीत, तर अन्यधर्मीय बांधवही अशा साहित्याची खरेदी करताना दिसत आहेत.साहित्य असे,ख्रिसमस ट्री- १ ते १२ फूट उंचीचे (किंमत ५० ते ३००० रु.), सांताक्लॉज पुतळा - ३ ते १० हजार, गवानी पुतळा ५० ते २०० रुपये, डेकोरेशन टेडी, जिंगल बेल्स- १० ते ८०० रुपयांपर्यंत, सर्व साहित्य थर्माकोल व प्लास्टिकविरहित बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे.

ख्रिसमस ट्री, लहानग्यांना खाऊ देणारा सांताक्लॉज कपड्यांसह सजावटीच्या साहित्यालाही मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे हे पर्यावरणाचा समतोल राखणारे सर्व साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे.- ज्योतिरादित्य साळोखे, विक्रेते,

 

 

टॅग्स :Christmasनाताळkolhapurकोल्हापूर