शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फरकाशिवाय बाजार समिती कर्मचाऱ्यांना ‘सातवा’ लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:52 IST

केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. सरकारने जानेवारी २०१६ पासून वेतन आयोग लागू करण्यास सांगितला होता; पण समिती प्रशासनाने मागील ३९ महिन्यांचा फरक न देता थेट एप्रिल २०१९ पासून पगारापासून लागू केल्याने समितीचे ३ कोटी ९० लाख रुपये वाचले आहेत.

ठळक मुद्देफरकाशिवाय बाजार समिती कर्मचाऱ्यांना ‘सातवा’ लागूकर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ : समितीचे फरकाचे ३.९० कोटी वाचले

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. सरकारने जानेवारी २०१६ पासून वेतन आयोग लागू करण्यास सांगितला होता; पण समिती प्रशासनाने मागील ३९ महिन्यांचा फरक न देता थेट एप्रिल २०१९ पासून पगारापासून लागू केल्याने समितीचे ३ कोटी ९० लाख रुपये वाचले आहेत.करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व निम्मा कागल तालुका असे कार्यक्षेत्र कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे आहे. समितीची वार्षिक उलाढाल १८०० कोटींची असून, उत्पन्न १४ कोटींपेक्षा अधिक आहे. राज्यातील ३०० बाजार समित्यांपैकी सक्षम समिती म्हणून कोल्हापूरच्या समितीकडे पाहिले जाते.सरकारचे सर्व नियम समिती कर्मचाऱ्यांना लागू असून केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयानुसार सातवा वेतन आयोगही या कर्मचाऱ्यांना लागू होता. जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश सरकारने दिले होते. राज्य सरकारने जानेवारी २०१९ पासून आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला आहे.

जानेवारी २०१६ पासूनचा ३६ महिन्यांचा वेतनवाढीचा फरक रोखीने अथवा प्रॉव्हिडंट फंडास वर्ग केला जातो. समिती प्रशासनाने तसे न करता एप्रिल २०१९ पासून तो कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महिन्याला ३५०० पासून १८००० रुपयांपर्यंत पगारात वाढ झाली आहे.

वेतनामुळे साधारणत: महिन्याला दहा लाख रुपये बोजा वाढीव समितीवर पडणार आहे; पण सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे जानेवारी २०१६ पासून म्हणजेच गेल्या ३९ महिन्यांचा फरक कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. परिणामी समितीचे त्यापोटी साधारणत: ३ कोटी ९० लाख रुपयांची बचत झाली आहे.

दृष्टिक्षेपात बाजार समितीकार्यक्षेत्र : करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, कागल (निम्मा)उलाढाल : १८०० कोटी वार्षिकउत्पन्न : १४ कोटीकर्मचारी : १२५

वेतनात अशी झाली वाढ -शिपाई : ३५०० रुपयेलिपिक : ६००० रुपयेनिरीक्षक, उपसचिव, सचिव : १८००० रुपये

सरकारच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे बंधनकारक होते. जानेवारी २०१६ पासूनचा फरक न देता थेट एप्रिल २०१९ पासून वेतन आयोगानुसार पगार दिला. कर्मचाºयांनी समितीला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानावे लागतील.- बाबासो लाड, सभापती, बाजार समिती

 

टॅग्स :agricultureशेतीkolhapurकोल्हापूर