शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात घाव घालून विवाहितेचा खून

By admin | Updated: August 7, 2014 00:16 IST

कऱ्हाडातील घटना : कारण अस्पष्ट; आरोपी पसार

कऱ्हाड : येथील उर्दू हायस्कूलसमोरच्या झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या महिलेच्या डोक्यात घाव घालून तिचा निर्घृण खून करण्यात आला़ आज, बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़ रेहाना यासीन सुतार (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रिंग व्यावसायिक असणारा यासीन सुतार हा शहरातील उर्दू हायस्कूलसमोरील झोपडपट्टीत पत्नी रेहाना व तीन मुलांसह वास्तव्यास आहे़ यासीन हा कामानिमित्त शहराबाहेर जात होता. गेल्या काही महिन्यांपासून यासीन सांगली येथे कामासाठी गेला आहे, तर त्याची पत्नी रेहाना ही मुलांसह कऱ्हाडातच वास्तव्यास होती़ दरम्यान, आज सकाळी रेहाना यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे शेजारील महिलांच्या निदर्शनास आले़ सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ मात्र, साडेनऊ वाजूनही रेहानाने दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला़ त्यांनी दरवाजा ठोठावूनही आतून कसलाच प्रतिसाद आला नाही़ त्यामुळे झोपडपट्टीतील इतर नागरिकांनी त्याठिकाणी गर्दी केली़ सर्वांनी दरवाजा उघडून घरात जाऊन पाहिले असता रेहाना रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले़ याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले़ त्यांनी परिसराची पाहणी केली़ रेहानाच्या डोक्यात वर्मी घाव घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़ वर्मी घाव व अती रक्तस्त्राव झाल्यामुळे रेहानाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले़ घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे़